ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

उजनी धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा 35 टीएमसी पाणीसाठा कमी:उपयुक्त पातळी उणे 23.72 टक्क्यांवर,

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चालू वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात माढा तालुक्यासह उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. अपवाद वगळता बहुतांश भाग कोरडाच राहिल्याने खरीप हंगामाची सुरुवात रखडली आहे. यंदा अल निनोच्या परिणामामुळे पाऊस कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. १४ जून २०२६ रोजी धरणातील एकूण पाणीसाठा ५०.९५ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा केवळ १२.६१ टीएमसी आहे. धरणाची उपयुक्त पाणीपातळी उणे २३.७२ टक्क्यांवर पोहोचली आहे. याउलट १४ जून २०२५ रोजी उजनी धरणात ८५.४८ टीएमसी एकूण पाणीसाठा, २१.८३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आणि ४०.७४ टक्के पाणी उपलब्ध होते. म्हणजेच यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३५ टीएमसीने कमी पाणीसाठा शिल्लक आहे. खरीप पेरण्यांसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे भविष्यात पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतेच्या छायेत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. उजनी धरणची पावसाळ्या पूर्वीच्या कामांना वेग‎ धरणाच्या भिंती, गेट्स आणि यंत्रणांची तपासणी व दुरुस्ती. सर्व दरवाजे (गेट्स) उघडणे-बंद करणे याची चाचणी. गंजलेले भाग रंगकाम व ऑइलिंग करून कार्यक्षम ठेवणे. सांडवा (स्पिलवे) परिसरातील गाळ, झाडे-झुडपे हटविणे. कालवे, बोगदे आणि पाणी सोडण्याच्या मार्गांची स्वच्छता. धरण परिसरातील विद्युत यंत्रणा व जनरेटर तपासणी. पावसाचे मोजमाप करणारी उपकरणे व नियंत्रण प्रणाली कार्यरत ठेवणे. आपत्कालीन पूर नियोजन व बचाव पथकांची तयारी. धरणा खालील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे. पाणी साठ्याचा अंदाज घेऊन आवर्तन आणि विसर्ग नियोजन. धरण परिसरातील सुरक्षा भिंती, रस्ते आणि प्रकाश व्यवस्था दुरुस्ती

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर