ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सासरवाडीला धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयावर मेहुण्यांचा हल्ला:जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल, हिंगोलीच्या येडूद येथील प्रकार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


औंढा नागनाथ तालु्क्यातील येडूद येथे धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयाला चुलत मेहुण्यांनी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 8 गुन्हा दाखल झाला आहे. सध्या अधिक मास सुरू असल्याने जावयांना धोंडे जेवण देण्यासाठी सासरवाडीकडून निमंत्रण देऊन बोलावण्याची परंपरा आहे. यामध्ये धोंडे जेवणासोबतच कपड्यांचे आहेर या शिवाय आपापल्या कुवतीनुसार सोन्याचा दागिना देखील दिला जातो. तीन वर्षातून एकदा अधिक मास येत असल्याने या महिन्यात जावयांची सासुरवाडीकडून मोठी सरबराई होते. दरम्यान, हिंगोली येथील लखन बापुराव दाढेल यांनाही त्यांच्या सासुरवाडीकडून धोंडे जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार रविवारी ता. ७ त्यांच्या सासुरवाडीला येडूद येथे गेले होते. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ते सासुरवाडीत घरासमोर उभे असतांना त्यांचे चुलत मेहुणे बळीराम पोऊळकर व राजू पोऊळकर हे तेथे आले. तु “आमच्या गावी का आला?” असे विचारत जुन्या वादाची कुरापत काढली. यावेळी शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेल्याने दोघांनी संगनमत करून लखन यांना शिवीगाळ करून लाकडी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या माराहाणीत लखन हे जखमी झाले. या घटनेनंतर लखन दाढेल यांनी सोमवारी ता. 8 औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बळीराम पोऊळकर, राजू पोऊळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विश्‍वनाथ मुकाडे पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर