ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, 10 जुलै अंतिम तारीख:राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने जारी केले वेळापत्रक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पाठ्यपुस्तके लागू झाली आहेत. या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण अद्यापही अपूर्ण आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी १० जुलै ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जनगणनेची कामे सुरू झाल्यामुळे शिक्षकांचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे, ‘एससीईआरटी’च्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे नवीन वेळापत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यानुसार, इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता लवकरच जिल्हा व तालुकानिहाय प्रशिक्षणाची मालिका सुरू केली जाईल. मात्र, इयत्ता सहावीच्या शिक्षकांचे अद्याप कोणतेही प्रशिक्षण झालेले नाही. जनगणनेच्या कामात शिक्षकांचा सहभाग असल्याने सहावीच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले होते. इयत्ता सहावीच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रशिक्षणासाठी मराठी माध्यमातील २४४ आणि उर्दू माध्यमातील २४० प्रशिक्षक अपेक्षित आहेत. संबंधित तपशील १५ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तालयाने दिले आहेत. प्रत्येक वर्गाच्या प्रशिक्षणात जिल्ह्यात कार्यरत विशेष शिक्षक आणि साधन व्यक्तींचाही समावेश करावा, तसेच त्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्याची दक्षता घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यांनी अनुभवी शिक्षक, व्याख्याते, पर्यवेक्षकीय अधिकारी आणि अभ्यासक्रम निर्मितीत सहभागी तज्ज्ञांचा समावेश करण्याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. इयत्ता सहावीच्या शिक्षकांसाठी पूर्वतयारी कार्यशाळा १७ आणि १८ जून रोजी आयोजित केली जाईल. त्यानंतर, राज्यस्तरीय प्रशिक्षण २२ ते २५ जून या कालावधीत होईल. जिल्हास्तरीय प्रशिक्षण २९ जून ते २ जुलैदरम्यान, तर तालुकास्तरीय प्रशिक्षण ४ ते १० जुलैदरम्यान होणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर