ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

फुबगाव येथील ३४ बाधित कुटुंबांचा १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा:पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले, प्रशासनाकडे केली मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव-सैदापूर येथील ३४ बाधित कुटुंबांनी १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे पुनर्वसन रखडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. १९ जुलै २०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथे दरड कोसळली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई व मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करण्याचे आदेश दिले होते. जवळपास चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप ३४ बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले नाही. गावातील उपलब्ध शासकीय जागेवर पुराचा धोका असल्याने योग्य पुनर्वसन होऊ शकत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मौजा फुबगाव येथील वर्ग-१ गट क्रमांक १०९ व ११० चे मालक रमेश भगवंतराव चीचखेडे यांनी पुनर्वसनासाठी स्वतःची शेती देण्याची लेखी तयारी तहसीलदारांकडे दर्शविली आहे. या मागणीसाठी बाधित कुटुंबांनी २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ दरम्यान तहसील कार्यालय चांदूर बाजार येथे बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी प्रस्ताव पाठवून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बाधित कुटुंबांनी पुन्हा १ जून २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी श्रीकृष्ण वऱ्हाडे, निरंजन कुरवाडे, दिलीप वऱ्हाडे, उत्तमराव वऱ्हाडे, राजू बोरवार, दादाराव वऱ्हाडे, भारत वऱ्हाडे, विलास वऱ्हाडे, रमेश भानगे, रोशन वऱ्हाडे, देविदास वऱ्हाडे, अशोक वऱ्हाडे, निलेश वऱ्हाडे आदी उपस्थित होते. सध्या काही कुटुंबे जिल्हा परिषद शाळेत, तर एक कुटुंब समाज मंदिरात राहत आहे. उर्वरित कुटुंबे जीव मुठीत धरून त्याच धोकादायक परिसरात वास्तव्य करत आहेत. आगामी पावसाळ्यात पुन्हा दरड कोसळून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर