ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ऑनलाईन औषधी विक्री निषेधार्थ औषध विक्रेत्यांचा मूक मोर्चा:विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन सादर; संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ऑनलाईन औषध विक्रीसह विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ मारेगाव तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी आपली मेडिकल दुकाने बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढला. या आंदोलनामुळे शहरातील पूर्ण औषध दुकाने दिवसभर बंद राहिल्याने या आंदोलनाची सर्वत्र चर्चा रंगली होती. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सकाळपासूनच शहरातील मेडिकल व्यावसायिक एकत्र येत त्यांनी शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते. तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशीही भूमिका संघटनेने मांडली. या आंदोलनात तालुक्यातील अनेक मेडिकल संचालक, औषध विक्रेते व व्यावसायिक सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाने निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, मेडिकल दुकाने बंद असल्यामुळे अनेक नागरिकांना औषधे घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन जनहित आणि व्यवसायाच्या अस्तित्वासाठी असल्याचे सांगितले.यावेळी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत जयस्वाल, सचिव नीलेश जुमडे, कोशाध्यक्ष कैलास ठेंगणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण कुचनकर, कार्तिक शेंडे तसेच प्रभाकर ढवस, डॉ .डाखरे,विनोद पारखी .मनिशा नागपुरे अतुल बोबडे, गौरव गौरकार,आशिष गौरकार, .प्रशांत गुरुनुले, नरेंद्र जिवतोडे, राहुल गौरकार, सदानंद काकडे, मुजफर शेख, स्नेहा मस्की,अनिकेत कुचणकर, शतपलकर विपुल पोटे, मंगला आंबटकर, लक्ष्मण वाघाडे, असीम शेख, शेषराव उधार, अभि खंडाळकर, मनीष दुगड, मंगेश बुचे, अमोल चौधरी,श्रेयश दरबेशवार ,वनमाला ठेंगने, वनश्री गौरकार पार्थ जयस्वालआदी पदाधिकारी व औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे, बेकायदेशीर औषध विक्री थांबवावी, औषध व्यवसायाशी संबंधित नियमांमध्ये पारदर्शकता आणावी तसेच स्थानिक मेडिकल व्यावसायिकांच्या हिताचे संरक्षण करावे, अशा विविध मागण्या केल्या. शहरातील प्रमुख मार्गाने मूक मोर्चा काढत आंदोलनकर्ते तहसील कार्यालयावर पोहोचले. तेथे तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसाय धोक्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर