ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वाढीव मानधनासाठी महिलांचा एल्गार मोर्चा:डीएचओ कार्यालयावर मोर्चा; थकीत मानधनासह सेवासुरक्षेची मागणी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अंशकालीन स्त्री-परिचारीकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन ‘स्त्री’-परिचर संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी १५ जून रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाढीव मानधनाचा लाभ अद्याप मिळालेला नसल्याने तसेच चार-चार महिने मानधन रखडत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील स्त्री-परिचरांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्यामार्फत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन पाठवले असून, शासनाने १७ मार्च २०२६ रोजी काढलेल्या निर्णयानुसार १ एप्रिलपासून मानधनात तीन हजार रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली असली तरी, अद्याप वाढीव मानधनाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आरोग्य केंद्रांमध्ये अर्धवेळ कर्मचारी म्हणून नियुक्ती असूनही पूर्णवेळ जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याचे सांगत ‘स्त्री’-परिचरांनी समान कामाला समान वेतन लागू करण्याची मागणी केली. याशिवाय सेवेत कायमस्वरूपी समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रमुख मागण्यांवर भर अंशकालीन स्त्री-परिचरांनी थकीत फरक बिलासह वाढीव मानधनाची अंमलबजावणी, दरमहा नियमित मानधन, सेवेत कायम समावेश, किमान वेतनानुसार वेतनश्रेणी, सामाजिक सुरक्षा व पेन्शन योजना, प्रसूती रजा, सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती तसेच गणवेश व ओळखपत्रासाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी केली. संघटनेने या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर