ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

‘आपले सरकार’ची ग्रामीण भागातील आयडी शहरात चालवणाऱ्यांना नोटीस:विजेच्या लपंडावाने नागरिक,‎व्यवसायिक, दुकानदार त्रस्त‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील काही ठिकाणी आपले सरकार केंद्रात एसडीओ, तहसीलदार,नायब तहसीलदार यांना अनागोंदी कारभार दिसून आला आहे. ग्रामीण भागातील आयडी चा वापर शहरी भागात केल्याची बाब उघडकीस आली आहे. केंद्रामध्ये मूलभूत सुविधेसह अनेक त्रुट्या आढळून आल्या आहेत.पुसद शहरातील अशा चार केंद्रांना शो कॉज नोटीस बजावली आहे.तर दिग्रस मध्ये एका केंद्र चालकाला शो कॉज नोटीस बजावली आहे. पुसद तालुक्यामध्ये १८८ आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहेत. तर दिग्रस तालुक्यामध्ये ८७ केंद्र सुरू केले आहेत.महाराष्ट्र शासनाने उदात्त हेतू ठेवून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्याच गावांमध्ये विविध प्रकारचे दाखले मिळावे याकरिता आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले होते.परंतु त्याच केंद्रामध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.तालुक्यातील ५१ केंद्रावर उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत.तर ४५ ठिकाणी तहसीलदार रेखा वाणी (मोहिते) यांनी भेटी दिल्या आहेत.त्याशिवाय नायब तहसीलदार चंपा राठोड यांनी ९२ ठिकाणी भेटी दिल्या आहेत.त्या सर्वांपैकी चार सेवा केंद्रामध्ये तुर्टी आल्याची आढळून आले आहे.तर सर्व सेवा केंद्र चालकांना सुविधा उपलब्ध ठेवण्याचे आवाहन केले आहे.जर त्रुटी आढळल्यास त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे,अशी माहिती कळवण्यात आली आहे. दिग्रस तालुक्यातील ८७ पैकी पुसदच्या उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी चार ठिकाणी, तर दिग्रसच्या तहसीलदाराने २४ ठिकाणी व नायाब तहसीलदाराने ४९ ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी केली. त्यामध्ये ग्रामीण भागाची आयडी चालविणारा आढळून आला आहे.त्याला येथील कार्यालयामार्फत शो कॉज नोटीस बजावली आहे. त्या ठिकाणी उपविभागीय महसूल अधिकारी बिजवल यांना मूलभूत व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले होते. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आढळून आली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर