ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मुंबईत लवकरच धावणार ‘देवाभाऊ’ आणि ‘छावा’ टॅक्सी:खासगी कंपन्यांच्या कमिशनला राज्य सरकारचा मोठा शह; वाचा काय आहे योजना?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. ओला आणि उबेर सारख्या खासगी ॲप-आधारित टॅक्सी सेवांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. प्रवाशांना कमी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि टॅक्सी चालकांच्या फायद्यासाठी राज्यात लवकरच ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांचे खिसे हलके होणार नाहीत, तर चालक आणि वाहन मालकांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे. खासगी कंपन्यांच्या अवाजवी कमिशनला बसणार चाप! भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी या नव्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. सध्या बाजारात असलेल्या ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या खासगी कंपन्या चालकांकडून कमिशन आकारतात. यामुळे दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांच्या हातात अतिशय कमी उत्पन्न पडते. या लुटीला पर्याय म्हणून सहकार तत्त्वावर आधारित ही नवीन टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले. ‘भारत टॅक्सी मॉडेल’च्या धर्तीवर महाराष्ट्रात अंमलबजावणी दिल्ली आणि कोलकाता येथे सरकारी पाठबळ असलेल्या टॅक्सी सेवा यशस्वी ठरल्यानंतर, महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर ‘देवाभाऊ टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ ॲप विकसित केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘भारत टॅक्सी मॉडेल’मुळे देशभरात चालकांना मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे. अंजली दमानिया यांना दरेकरांचे प्रत्युत्तर “माहिती न घेता ट्विट करून टीका करण्याचं सुख तुम्हाला मिळालं असेल, पण यामुळे जनतेची फसवणूक झाली,” अशा शब्दांत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अंजली दमनियांना सडेतोड उत्तर दिले. ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ हा मुंबई बँकेचा उपक्रम नसून तो ‘देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्थेचा’ आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले. बँक केवळ नियम आणि प्रचलित व्याजदराच्या अधीन राहून कर्ज पुरवठा करत आहे. उपक्रमाच्या नावावरून होणाऱ्या वादावर बोलताना ते म्हणाले की, सहकारी संस्थेने काय नाव ठेवावे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. टॅक्सी चालकांचे शोषण करणाऱ्या कंपन्यांना सहकारातून सशक्त पर्याय देत बेरोजगार तरुणांना ड्रायव्हरऐवजी ‘भागीदार’ होण्याची संधी देणाऱ्या या उपक्रमाला बदनाम करून काय साध्य होणार? असा जळजळीत सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे. अंजली दमानिया काय म्हणाल्या होत्या? गिरगावातील ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाला नवे वळण!:मनसैनिकावर गुन्हा दाखल; मनसेचा सवाल – नियम आमच्यासाठीच का? मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या कथित ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाने आता राजकीय आणि कायदेशीर स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणात आंदोलन करत पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर