ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

चार वर्षांपासून दुर्लक्ष, ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण:सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील ग्राम सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर या महत्त्वाच्या जोडरस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडून निघाला असून सर्वत्र खडी व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरुन दररोज शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, रस्त्याची खराब अवस्था पाहता अपघाताचा धोका वाढला आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर रस्ता २०२० तयारी झाल्यानंतर एका वर्षातच त्याचे पितळ उघडे पडले होते. गत चार वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून, संबंधित विभागाने तातडीने दर्जेदार रस्ता उभारण्याची मागणी बंडूभाऊ सोळंके, किशोर गावंडे, महादेवराव डाबेराव, पांडुरंग सोळंके, पुरुषोत्तम तिवारे, ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरसाठ, प्रदीप गावंडे, नंदू सोळंके, विनोद शिरसाट,आकाश ढोके, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष प्रदीप गावंडे यांच्याद्वारा करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील पूर्णा नदी काठावर वसलेल्या गावांमधून वाळूची अवैधरित्या तस्करी करून वाहतूक होते. यामध्ये म्हैसांग, विरवाडा, सांगवा मेळ, लाखपुरी, खापरवाडा, दापुरा आदी ठिकाणांवरून वाळू माफियांकडून ओव्हरलोड वाहने भरून तस्करी होते. राजकीय वरदहस्त व लोकप्रतिनिधींची भागीदारी यामुळे ग्रामस्थांचा आवाज सातत्याने दाबला जातो. यामुळे देखील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत. ग्रामीण भागातील रहिवाशांच्या नशिबी चांगली रस्ते कधी येतील, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची अशीच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विकास कोणाचा झाला, असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. ग्रामीण भाग विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात महत्त्वाचे रस्तेच दुर्लक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे विकासकामांच्या गुणवत्तेवर व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तातडीने दुरुस्तीची मागणी सांगवा मेळ ते कौलखेड जहागीर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे. तसेच भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. पावसाळ्याच्या पेरणीच्या ऐन वेळेत शेतकऱ्यांना आपली बैलजोडी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने खते, बी-बियाणे पेरणीचे साहित्य नेताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ शकते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर