ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

काळ्याफिती लावून पटवारी संघाचे तीव्र धरणे आंदोलन

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या निलंबनाचा जाहीर निषेध; मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:- विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा शाखा यवतमाळ अंतर्गत उपविभाग शाखा वणीच्या वतीने सोमवारी (दि. २२ जून) वणी व मारेगाव येथे काळ्याफिती लावून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यासह नेर तालुक्यातील चार ग्राम महसूल अधिकाऱ्यांवरील निलंबन कारवाईचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.मारेगाव येथील तहसील कार्यालयासमोर तसेच वणी येथे मोठ्या संख्येने ग्राम महसूल अधिकारी सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून “संघ शक्ती कलीयुगे” आणि “पटवारी एकता जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर आरोप करताना सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणारे जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून सूडबुद्धीने निलंबित करण्यात आले आहे.

संघटनेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यासह चारही ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन तातडीने व विनाशर्त मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

तसेच नेर तहसीलदारांकडून होत असलेल्या कथित छळाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे रखडलेले जानेवारी महिन्याचे वेतन त्वरित अदा करावे, सूडबुद्धीने करण्यात आलेल्या विविध कारवाया रद्द कराव्यात व संवर्गाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आल्या.

यापूर्वीच दि. १८ जून रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती संघटनेने दिली. मागण्या मान्य न झाल्यास वणी उपविभागासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.

आंदोलनाचे आयोजन विदर्भ पटवारी संघाचे आद्य संस्थापक कै. माखनलालजी यद् साहेब व संघर्षी महर्षी के. व्ही. एम. उजवणे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या आंदोलनात विदर्भ पटवारी संघ, उपविभाग शाखा वणीचे अध्यक्ष नितेश पाचभाई, उपाध्यक्ष संदेवल कुळमेथे, सचिव मुकेश इंगोले यांच्यासह महिला व पुरुष ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर