ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

संत साहित्य समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव- योगीराज महाराज:नांदखेड येथे एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चोहोट्टा बाजारजवळील नांदखेड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्री एकनाथी भागवत सामूहिक पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची रविवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. संत साहित्य हे समाजाला दिशा देणारे अमूल्य वैभव असल्याचे संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे वंशज श्री योगिराज महाराज गोसावी म्हणाले. त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने भाविकांना अध्यात्माची मेजवानी मिळाली. महोत्सावत हजारो वारकरी, शेतकरी व भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर दुमदुमला. गजानन महाराज येरोकार यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात दररोज काकडा, हरिपाठ, भागवत पारायण, प्रवचन, भजन व हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संतवाणी, भागवत धर्माच्या विचारांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सांगता सोहळ्यात काल्याच्या कीर्तनादरम्यान योगिराज महाराज गोसावी यांनी संत एकनाथ महाराजांच्या संत वाङ्मयाचे महत्त्व विशद केले. संत साहित्य हे समाजाला संस्कार, सदाचार, समता आणि मानवतेची शिकवण देणारे अमूल्य वैभव आहे.
संतांच्या विचारांचा प्रसार झाला तर समाजात शांतता, बंधुता आणि नैतिक मूल्यांची जपणूक होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने या संतवचनाप्रमाणे संपूर्ण परिसरात टाळ-मृदुंगाच्या निनादात दिंडी, कीर्तन सेवा पार पडली. महोत्सवाअंतर्गत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. वारकरी, युवक, महिला भगिनी आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, निवासाची व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सोहळ्यामुळे नांदखेड गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सात दिवस चाललेल्या भव्य धार्मिक महोत्सवाची सांगता संतवाणी, हरिनाम, भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहपूर्णरित्या उत्साहात पार पडले. उपस्थित भाविकांनी हा सोहळा आयुष्यभर स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त केल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर