ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

अजित पवारांचा अपघात नव्हे 100% घातपात:विजय वडेट्टीवार यांचा दावा; AAIB च्या अहवालावर उपस्थित केले गंभीर प्रश्नचिन्ह

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100 टक्के घातपात असल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणी अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने सादर केलेल्या अहवालावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एएआयबी अजित पवारांचे विमान झाडाला धडकून खाली कोसळले अशी तकलादू थेअरी देत असेल, तर त्यामुळे अजितदादांचा घातपात झाला हे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर काल या घटनेला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर एएआयबीने (विमान अपघात तपास ब्यूरो) या घटनेशी संबंधित आपला प्राथमिक अहवाल जाहीर केला. या अहवालात अजित पवारांचे विमान प्रथम झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केला आहे. अजितदादांचा घातपातच झाला विजय वडेट्टीवार एएआयबीच्या अहवालावर ‘साम’ वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, एएआयबीच्या अहवालात विमान एका झाडाला धडकले आणि खाली कोसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते अशी तकलादू थेअरी देत असतील तर त्यातून स्पष्ट् होते की, अजितदादांचा अपघात नाही, तर घातपात आहे. तब्बल एका महिन्याने असा अहवाल आला. त्यात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. माझ्या मते हा अहवाल पूर्णतः मॅनेज आहे. हा ठरवून दिलेला अहवाल आहे. हा 100 टक्के अपघात नाही. हा अजितदादांचा घातपातच आहे. सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. ते विमान हवेतच उलटल्याचे दिसत आहे. त्यानंतर ते धाडकन खाली आपटले. त्यांचे म्हणणे आहे, कोणत्या तरी झाडाला अडकून कोसळले. असा अहवाल पाहिल्यानंतर त्यांना फटके मारले पाहिजेत. हा सत्य लपवण्याचा व दडपण्याचा प्रकार आहे हे या अहवालातून दिसते. या अहवालावर चर्चा झाली व्हावी अशी मागणी आम्ही करू, असे वडेट्टीवार म्हणाले. काय आहे AAIB च्या अहवालात? एएआयबीने आपल्या 22 पानी अहवालात म्हटले आहे की, बारामती विमानतळावरील कमी दृश्यमानता, व्हीएफआर (Visual Flight Rules) नियमांचे उल्लंघन, एअरफिल्ड अपुऱ्या सुविधा, स्वतंत्र MET सुविधेचा अभाव यामुळे ही विमान दुर्घटना घडली. विशेषतः अपघातावेळी हे विमान अगोदर झाडांवर कोसळले. त्यानंतर ते खाली पडून त्याला आग लागली, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अजित पवारांच्या विमानाने लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नानंतर गो अराऊंड केले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ते धावपट्टीच्या डाव्या बाजूला 50 मीटर अंतरावर कोसळले. अपघाताच्या काही क्षणापूर्वी कॉकपिटमधून ‘ओह शिट’ असा आवाज आला, असेही हा अहवाल सांगतो. अहवालावर रोहित पवारांचाही अहवालावर आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एएआयबीच्या अहवालावर सवाल उपस्थित केला आहे. प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे. मी मुंबईत यावर सविस्तर बोलेल, असे त्यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… DGCA +व्हिएसआर = AAIB:कोण कुणाला वाचवतंय तेच कळेना, मिटकरींचा अजित पवारांचे विमान झाडाला धडकलेच नसल्याचा दावा
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीए, व्हिएसआर व एएआयबीमध्ये कोण कुणाला वाचवत आहे हेच कळत नाही. पण महाराष्ट्राला दुधखुळा समजण्याचे काम कुणीही करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांचे विमान झाडाला धडकून नंतर खाली कोसळल्याचा दावाही त्यांनी धुडकावून लावला आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर