ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

ठरावांची अंमलबजावणी रखडली; अधिकाऱ्यांचे टोचले कान:सभांमध्ये झालेल्या ठरावांवर चर्चा, विकासकामांच्या फाइली किंवा तक्रारी प्रलंबित न ठेवण्याची दिली तंबी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मनपाच्या सर्वसाधारण सभेतील आणि स्थायी समितीच्या सभेतील ठरावांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आजवर विविध सभांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रशासनाकडून काय अंमलबजावणी झाली, तसेच विकासकामांची प्रगती कुठपर्यंत पोहोचली, याचा आढावा घेण्यात आला. अनेक ठरावांची अंमलबजावणी रखडत रखडत होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची कान टोचण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर शारदा खेडकर होत्या. तर स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, सभागृह नेते पवन महल्ले उपस्थित होते. या बैठकीत नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग आणि एनयूएलएम विभागांतर्गत झालेल्या ठरावांवर चर्चा झाली. सभापती विजय अग्रवाल यांनी तिन्ही विभागांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी कामे करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य व इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. शहराचा विकास करताना कोणत्याही फाइल्स किंवा तक्रारी प्रलंबित राहू नयेत, अशी तंबी यावेळी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना दिली. या बैठकीला मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे, विठ्ठल देवकते, राजेश सरप, नगरसेवक नितीन ताकवाले, अमोल मोहोकार, हर्षद भांबेरे, माजी नगरसेवक तुषार भिरड, सहाय्यक नगररचनाकार मृणालिनी मानतकर, संदीप गावंडे, अनिल बिडवे यांच्यासह विविध विभागांचे कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. अतिक्रमण, नालेसफाईवर जास्त लक्ष देण्याची सूचना शहरातील मुख्य रस्त्यांवरील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व कनिष्ठ अभियंत्यांनी आपापल्या क्षेत्रात पाहणी करून विनापरवानगी सुरू असलेल्या बांधकामांना तत्काळ नोटिस देऊन काम थांबवावे, असे सांगण्यात आले. आगामी पावसाळा लक्षात घेता, सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नालेसफाईच्या कामात अधिक लक्ष घालून काम चोख करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर