ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सरसगट कर्जमाफी अन् खतांच्या तुटवड्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक:जिंतूर-कनेरगाव नाका मार्गावर तब्बल दोन तास ‘रस्ता रोको’!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी, बियाणे, खतांचा तातडीने मुबलक पुरवठा करावा यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी ता. 11 सकाळी आकरा वाजता जिंतूर ते कनेरगावनाका मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे गोरेगाव मार्गे विदर्भात जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली, मात्र सदर योजना फसवी असल्याचा आरोप क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या शिवाय बाजारपेठेत डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. बियाणे व खते नसल्याने अनेक ठिकाणी जादा दराने खते खरेदी करावे लागत आहेत. या शिवाय घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्ते थकल्यामुळे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणेही कठीण झाले आहे. शासनाने सरसगट कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिंतूर ते कनेरगाव नाका मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी क्रांतीकारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, श्याम मते, विठ्ठल वायचाळ, सखाराम भाकरे, अशोक जयस्वाल, दामोदर घुमणार,बबन कांबळे, विशाल पोळ, राहुल कावरखे, मनोहर सावके, संदीप मानमोठे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नायब तहसीलदार सरोदे, कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी काळे, सेनगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्या जाणून घेतल्या. या मागण्यां शासनाकडे कळविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर दोन तासांनी रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार अनिल भारती यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर