ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस:जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही, सरकारला इशारा; मुंबईत आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा त्याग केल्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रक्तातील साखरेची पातळी 50 पेक्षा कमी झाल्याने हायपोग्लायसेमियाचा धोका निर्माण झाला असून अशक्तपणा, अंधारी येणे, तीव्र डोकेदुखी आणि किडनीवर परिणाम झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांनी आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला असतानाही, जीव गेला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही, अशी ठाम भूमिका तुपकर यांनी घेत सरकारला इशारा दिला आहे. तुपकरांच्या समर्थनार्थ मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा: ‘गेटवे ऑफ इंडिया’वर आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न शेतकरी नेते रविकांत तुपकर त्यांची प्रकृती ढासळल्याचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत. तुपकरांच्या समर्थनार्थ संतप्त शेतकऱ्यांनी थेट मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे धाव घेत समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मात्र, तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड केली असून, परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अकोला-हैद्राबाद हायवे रोखला, टायर पेटवले
तुपकरांची प्रकृती खालावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वाशिममध्ये शेतकरी आणि कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले. संतप्त आंदोलकांनी अकोला-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मलकापुरात संताप; शेतकऱ्यांनी स्वतःचेच साहित्य जाळले
दुसरीकडे, सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत मलकापूर तालुक्यातील वाघुळ येथील शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. सरकारने शेतीचा वीज पुरवठा १२ तासांवरून ६ तासांवर आणल्याने पिके जळत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेले सिंचन साहित्य शेतातच पेटवून दिले. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान: संभाजीनगर-जालना, नाशिकसह राज्यभरात राजकीय प्रतिष्ठा पणाला; 6 आधीच बिनविरोध
राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. वाचा लाइव्ह अपडेट्स..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर