ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू:आमदार प्रमोद जठार यांचे विधान, म्हणाले- आमचा नेता मजबूत, आम्ही त्यांच्या पाठीशी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोदीजी कोणत्याही रात्री काहीही बंद करू शकतात, असे म्हटले आहे. तसेच मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू, असे विधान भाजप नेते व आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. देशातील सद्यपरिस्थितीवरून विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यात भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता प्रमोद जठार यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. प्रमोद जठार कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले, आमचा नेता मजबूत आहे. देशातील सरकार मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी रहा आणि ते जे सांगतील ते ऐका, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच मोदीजी कोणत्याही रात्री काहीही बंद करू शकतात. तसेच मोदींनी समुद्रात जरी उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू, असे विधान त्यांनी केले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. प्रमोद जठार यांनी केलेल्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर देखील त्यांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी यावरून टोलेबाजी सुरू केली आहे. कोण आहेत प्रमोद जठार? कोकणातील भाजपचा एक प्रमुख चेहरा असलेले आणि पक्षात सातत्याने सक्रिय असणारे नेते प्रमोद जठार यांची नुकतीच भाजपकडून विधान परिषदेवर निवड झाली आहे. यापूर्वी, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा अवघ्या 32 मतांनी निसटता पराभव करून लक्षवेधी विजय मिळवला होता. त्यानंतर भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले जठार सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय पक्ष संघटनेने त्यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली असून, कोकणातील नाणार रिफायनरीसारख्या औद्योगिक प्रकल्पांबाबतही त्यांनी यापूर्वी आपली अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर