ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

नोकरीची बातमी:मुंबईत POCSO अंतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मागवले अर्ज, काय आहे पात्रता, जाणून घ्या सविस्तर माहिती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत आपले अर्ज ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७, बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई – ४०००१८’ या पत्त्यावर सादर करावेत. तसेच अर्ज ई-मेलद्वारे depumumbai12@gmail.com वरही पाठविता येतील. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येणार आहे. काय आहे पात्रता? सपोर्ट पर्सनसाठी सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर असून किमान तीन वर्षांचा बाल शिक्षण, विकास किंवा संरक्षण क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान (MSCIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र) अपेक्षित आहे. तसेच बालहक्क किंवा बालसंरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थांनाही अर्ज करता येणार असून बालगृह किंवा शेल्टर होममधील संबंधित अधिकारीही पात्र ठरू शकतात. किती वर्षांसाठी नियुक्ती? निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात येणार असून दरवर्षी कामगिरीचा आढावा घेतला जाईल. आवश्यकतेनुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPO) यांच्या शिफारशीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर कालावधी वाढविला जाऊ शकतो. वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्यात येईल. सपोर्ट पर्सनची भूमिका काय?
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये, न्यायप्रक्रियेदरम्यान (तपास आणि खटला) पीडित बालकाला आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे, त्यांना कायदेशीर प्रक्रियेत मार्गदर्शन करणे, आणि बालकाचे हक्क व संरक्षण सुनिश्चित करणे ही सपोर्ट पर्सनची मुख्य जबाबदारी असते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर