ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

षण्मुखानंदमध्ये उबाठा गटाचा वर्धापन दिन सोहळा:6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर आणि भाजप रडारवर?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व उलथापालथ सुरू असतानाच, आज (१९ जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ६० वा वर्धापन दिन सोहळा सायन येथील ऐतिहासिक ‘षण्मुखानंद सभागृहात’ पार पडत आहे. ऐन वर्धापन दिनाच्या तोंडावर पक्षाच्या ६ खासदारांनी ‘व्हिप’ धुडकावून दिलेल्या हुलकावणीमुळे ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी, या संकटाचा धैर्याने सामना करत पक्षाकडून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, राज्यभरातून निष्ठावान शिवसैनिकांचे जथ्थे मुंबईत दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय भूकंपाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. पक्षाचे ६ खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या मोठ्या दगाफटक्यानंतरही पक्षाची ताकद कमी झालेली नाही, हे दाखवण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत पक्षाशी आणि ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिलेले हजारो शिवसैनिक आज षण्मुखानंद सभागृहात गर्दी करणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य फुंकण्यासाठी आणि केडरला बळ देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
बंडखोर आणि भाजप उद्धव ठाकरेंच्या रडारवर? पक्षातील या ताज्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर, आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. ऐन वर्धापन दिनाच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या कृत्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात प्रचंड आक्रमकता पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाषणातील संभाव्य मुद्दे बंडखोरांवर हल्लाबोल: पक्षाशी गद्दारी करणाऱ्या ६ खासदारांचा समाचार उद्धव ठाकरे आपल्या खास शैलीत कसा घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. भाजपवर निशाणा: केंद्रीय यंत्रणांचा वापर आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली होणाऱ्या पक्षांतरावरून ते भाजपवर जोरदार कडाडण्याची शक्यता आहे. पुढील राजकीय दिशा: आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, ठाकरे पक्षाची पुढील रणनीती काय असेल आणि महाविकास आघाडीत पक्षाची भूमिका कशी राहील, याचे संकेत या भाषणातून मिळतील. ठाकरेंच्या पक्षाच्या वर्धापन दिनाचा टीझर शिवसैनिकांना आस्थेचा आणि संघर्षाचा संदेश गेल्या चार वर्षांत शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आजच्या या मंचावरून उद्धव ठाकरे उपस्थित हजारो निष्ठावंतांना भावूक आणि संघर्षाचा संदेश देण्याची चिन्हे आहेत. “पदे आणि सत्ता उपभोगणारे सोडून गेले, तरी जमिनीवर काम करणारा सामान्य शिवसैनिक अजूनही माझ्यासोबत आहे,” हा विश्वास ते कार्यकर्त्यांना देतील. षण्मुखानंद सभागृहातील ही गर्दी आणि उद्धव ठाकरेंची तोफ आगामी काळातील संघर्षाची ठिणगी टाकणारी ठरेल, यात शंका नाही. शिवसेना स्थापना दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांनी वांद्रे, कलानगर आणि मातोश्री भागात लावलेली पोस्टर्स हे ही वाचा… शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन:ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर खासदारांच्या जाहीर पक्षप्रवेशाची उत्सुकता! ठाकरे गटाच्या ६ विद्यमान खासदारांनी पक्षाचा ‘व्हिप’ धुडकावून गुरुवारी दिल्लीतील संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जाहीर विश्वास दाखवला. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, आज शिवसेना शिंदे गटाचा ६० वा वर्धापन दिन सोहळा गोरेगाव येथील भव्य ‘नेस्को सेंटर’मध्ये उत्साहात आणि प्रचंड शक्तीप्रदर्शनासह साजरा होत आहे. सविस्तर वाचा… ‘अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व’!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर