ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:देशात मुलींचे प्रमाण हजारामागे 918, तर राज्यातील शहरांमध्ये फक्त 885, गर्भलिंग चाचणीचा परिणाम; बिहार व हरियाणाच्या रांगेत बसला महाराष्ट्र

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशपातळीवर मुलींचा जन्मदर सुधारत असताना पुरोगामी महाराष्ट्राच्या शहरी भागात मात्र मुलींचा जन्मदर प्रचंड वेगाने घटतो आहे. देशात १००० मुलांमागे ९१८ मुली, तर महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात ८९९ मुलींचा जन्म झाला आहे. केंद्र सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम अर्थात एसआरएस-२०२४ च्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील शहरी भागात १००० मुलांमागे मुलींचा जन्मदर आधी ९०८ होता. आता तो घसरून ८८५ वर येऊन ठेपला आहे. यामुळे बिहार आणि हरियाणाच्या रांगेत महाराष्ट्र जाऊन बसला आहे. विशेष म्हणजे देशातील २२ मोठ्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राची कामगिरी सर्वात खराब आहे. महाराष्ट्र १८ व्या स्थानावर फेकला गेला आहे. देशातील ८९ लाख नागरिकांच्या सर्वेक्षणातून एसआरएसचा अहवाल तयार झाला आहे. नुकताच प्रसिद्ध झालेल्या या अहवालाचे ‘दिव्य मराठी’ने विश्लेषण केले तर हे धक्कादायक वास्तव समोर आले. शहरात मुली घटल्या देशात ग्रामीण भागात १००० मुलांमागे ९१४ तर शहरात ९२८ मुली जन्मतात. राज्यात २०१२-१४ मध्ये १००० मुलांमागे ८९६ मुली होत्या. २०२२-२४ मध्ये ही संख्या ८९९ झाली. ग्रामीण महाराष्ट्रात मुलींचा जन्मदार ८८८ वरून ९१० वाढला. शहरात मुलींचा जन्मदर ९०८ वरून ८८५ वर घसरला. स्त्री शिक्षणाचा परिणाम देशात अशिक्षित महिलांचा एकूण प्रजनन दर ३.२ आहे. म्हणजेच या महिला सरासरी ३ पेक्षा जास्त मुलांना जन्म देतात. पदवीधर महिलांचा प्रजनन दर १.६ असून त्या १ ते २ अपत्यांनाच जन्म देतात. महाराष्ट्र आता वृद्धत्वाकडे वळतोय देशात ६० पेक्षा अधिक वयाचे ९.७% तर राज्यात १०.४% लोकं आहेत. राज्यात एकूण मृत्यूंपैकी ६७.२% तर देशात ६०.८% मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे. प्रजननदरही कमीच देशात प्रति महिला प्रजनन दर १.९ तर महाराष्ट्राचा १.४ आहे. म्हणजेच राज्याचा जन्मदर ०.०५ ने कमी आहे. आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाबचा प्रजनन दर महाराष्ट्रा ऐवढा आहे. तर दिल्ली (१.२), केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल प्रत्येकी १.३ आहे. बिहार (२.९) तर युपी २.६ आहे. मुलींचे विवाह उशिरा देशात महिला विवाहाचे सरासरी वय २३.१ तर राज्यात २३.४ आहे. देशात ग्रामीण भागात मुलींच्या लग्नाचे सरासरी वय २२.६ तर शहरी भागात २४.४ आहे. महाराष्ट्रात हे वय अनुक्रमे २२.८ व २४.३ आहे. एक्स्पर्ट व्ह्यू ॲड. वर्षा देशपांडे सामाजिक कार्यकर्त्या प्रश्न : शहरात मुलींचा जन्मदर घटला?
उच्च जातीतील, श्रीमंतच गर्भलिंग चाचणी करू शकतात. ग्रामीणमधील शेतकरी पैसा कुठून आणेल. प्रश्न : मग यावर उपाय काय?
कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. कमिट्यांवर राजकीय नव्हे तर तज्ञ लोकांची नेमणूक झाली पाहिजे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर