ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

राज्यातील 8 शहरांना मिळाले नवे महापौर:नागपूर, संभाजीनगरसह 6 शहरांत भाजपचा महापौर; कोणत्या शहरात कोण महापौर झाले? वाचा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील 8 महापालिकांमध्ये आज महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह 6 शहरांत सत्ताधारी भाजप, तर एका महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर खुर्चीत बसला आहे. उर्वरित एका ठिकाणी सध्या महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे. सोलापूर, जळगाव, अहिल्यानगरात बिनविरोध निवड राज्यातील जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी – चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर व नाशिक या 8 बड्या महापालिकांत आज महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. यात सोलापूर, जळगाव व अहिल्यानगर येथील चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुका ऐनवेळी बिनविरोध झाल्या. तर नागपूर व धुळ्यात भाजपने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला. जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी वर्णी लागली. तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. दीपमाला काळे या जळगाव महापालिकेच्या 17 व्या महापौर ठरल्या आहेत. नागपुरात भाजपच्या नीता ठाकरे महापौर दुसरीकडे, नागपूर महापालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी तब्बल 104 मते मिळवत काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांचा पराभव केला आहे. या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत नीता ठाकरे यांना 104, तर स्नेहल ठाकरे यांना 36 मते पडली. 11 मतदारांनी येथे तटस्थ भूमिका बजावली. परिणामी, नीता ठाकरे यांचा मोठ्या मतफरकाने विजय झाला आहे. नांदेडमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर धुळे महापालिकेत सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत दुरंगी लढत दिसून आली. येथे भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी 50 मते मिळवत महापौरपदी विजय मिळवला. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या संयुक्त उमेदवाराला अवघ्या 13 मतांवर समाधान मानावे लागले. तिकडे नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. नांदेड महापालिकेच्या 81 पैकी 45 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. येथे भाजपने महापौरपदासाठी कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. येथे उपमहापौरपदासाठी दीपकसिंह रावत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. संभाजीनगरात समीर राजूरकर महापौर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी समीर राजूरकर व उपमहापौरपदासाठी राजेंद्र जंजाळ यांचे नाव निश्चित झाले आहे. येथे जंजाळ यांच्या नावाला शिवसेनेतूनच विरोध होण्याची शक्यता आहे. पण सूत्रांच्या मते, आता त्यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजपच्या शर्मिला बाबर यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे. येथेही महापौर निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर