ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पावसाळी अधिवेशन:टीईटी पेपरफुटीप्रकरणी विरोधक आक्रमक; सीबीआय चौकशीची मागणी

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून आज पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले. या गंभीर घोटाळ्याला थेट महायुती सरकारला जबाबदार धरत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. “पेपर फुटले भिवंडीला, पैसे गेले मालेगावला…” आणि “शिक्षकांचे नुकसान करणाऱ्या सरकारचा निषेध असो” अशा घोषणा देत विरोधकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. राज्यातील लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या या पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी यावेळी विरोधकांनी केली. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली प्रकरणातील मुख्य सूत्रधार दिवाकर निपुरेला अटक कधी करणार? – वडेट्टीवार सावकारी कर्ज रोशन कुळे प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेल्या दिवाकर निकुरे याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याबद्दल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रश्नोत्तरे काळात विधानसभेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, दिवाकर निकुरे या सावकाराने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून सुमारे १३० चेक दिले, मात्र ते सर्व चेक बाऊन्स झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करूनही तो अद्याप फरार असून त्याच्यावर कारवाई का होत नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे. असे वडेट्टीवार म्हणाले पत्रकारांच्या सुरक्षेवरून विरोधक आक्रमक दरम्यान, अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना झालेल्या कथित धमकी आणि अपशब्दांच्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अशा प्रकारे धमकावले जात असेल, तर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे काय? असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स पाहण्यासाठी खालील लाइव्ह ब्लॉगमधून जा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर