ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मी बीडचा वाघ, घाबरत नाही!:विलास घुले हत्याप्रकरणी मुलावरील आरोपांवर खासदार बजरंग सोनवणे आक्रमक; धनंजय मुंडेंवर नाव न घेता घणाघात

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्याप्रकरणी आता राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची मागणी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केल्यानंतर, आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर मृताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर, खासदार सोनवणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “मी काय भित्रा नाही, मी बीडचा वाघ आहे,” असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. मुलावर आरोप हे जाणीवपूर्वक राजकारण; तपासाला सहकार्य करणार आपल्या मुलावर होत असलेल्या आरोपांबद्दल खासदार बजरंग सोनवणे यांना विचारले असता ते म्हणाले, “केज तालुक्यात टाकळी फाट्यावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण ही घटना का घडली, भांडणे का झाली आणि विलास घुले तिथे का गेले, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.” “माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात घेणे, हे जाणीवपूर्वक केले जाणारे राजकारण आहे. मृताच्या कुटुंबीयांचा संशय असू शकतो, पण आमच्या इथे ‘कीड लागलेले’ राजकारण केले जात आहे. मुंबईत बसून काही नेते लोकांना चेतवण्याचे आणि भडकवण्याचे काम करत आहेत. मी या प्रकरणाला आणि पोलिसांच्या तपासाला पूर्ण सहकार्य करणार आहे. माझा मुलगा, माझे कुटुंब आणि कार्यकर्ते पोलीस यंत्रणेला हवी ती मदत करतील.” धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका विधानसभेत विलास घुले हत्याप्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी ‘पूर्वनियोजित कटाचा’ आरोप केला होता. तसेच, मस्साजोग हत्याप्रकरणाचा संदर्भ देत सोनवणे यांना प्रश्न विचारला असता ते धनंजय मुंडे यांच्यावर चांगलेच संतापले. ते म्हणाले, “ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय, तो काय नेता आहे का? त्याची उंची काय, लायकी काय? अशांना तुम्ही नेता म्हणता?” असा सवाल करत सोनवणेंनी मुंडेंवर निशाणा साधला. मराठा विरुद्ध वंजारी असे वाद लावणारी मंडळी राजकारणात अकार्यक्षम असतात, म्हणूनच ते असले वाद लावतात. राजकारणामध्ये फिल्डवर उतरून रात्रंदिवस काम करावे लागते. केवळ मुंबईत बसून कामे होत नाहीत.” तुम्ही नेत्याचे नाव का घेत नाही? असे विचारले असता, सोनवणे ताडकन म्हणाले, “मी काय कोणाला घाबरतो का? भित्रा आहे का? मी बीडचा वाघ आहे!” विधानसभेत मुंडे बंधू-भगिनींनी उठवला आवाज दरम्यान, २० जून रोजी घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत, “हा हल्ला पूर्वनियोजित कट असून या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तातडीने शोध घ्यावा,” अशी मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृह खात्याला योग्य कारवाई आणि दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणी पोलिसांना निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विलास घुले हत्याप्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एका बाजूला मुंडे बंधू-भगिनींनी हत्येचा सूत्रधार शोधण्याची मागणी लावून धरली आहे, तर दुसऱ्या बाजूला खासदार सोनवणे यांनी मुलावरील आरोप फेटाळत धनंजय मुंडेंवर थेट हल्लाबोल केला आहे. आता पोलिसांच्या पुढील तपासात आणि कारवाईत काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित बातम्या वाचा.. मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन, 3 दिवसांनी विलास घुलेंवर अंत्यसंस्कार:केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन, खासदारपुत्रावर गुन्ह्याची मागणी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणामुळे सलग तीन दिवस केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास थेट केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून ठिय्या मांडला. अखेर मध्यरात्री खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर आणि पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर, तब्बल 53 तासांनंतर (3 दिवसांनी) रात्री उशिरा विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. वाचा संपूर्ण बातमी बीड हत्याकांडाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित:मुंडे बंधू-भगिनी आक्रमक, पूर्वनियोजित कटाचा आरोप, सभागृहात जोरदार चर्चा
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले यांच्या हत्येचे तीव्र पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, आरोप-प्रत्यारोप, चौकशीची मागणी आणि कठोर कारवाईच्या सूचना यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणावर परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात जोरदार भूमिका घेत या हत्येमागील मास्टरमाईंडचा पोलिसांकडून बचाव सुरू आहे, असा गंभीर आरोप केला. तर मंत्री पंकजा मुंडे यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत गृह विभागाला योग्य चौकशीचे निर्देश दिले आहेत. येथे वाचा सविस्तर बातमी बीडमध्ये खळबळ!:भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल चालकाची चाकूने भोसकून हत्या, केजमध्ये तणावाचे वातावरण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात दोन गटांतील भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून, अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. या भीषण घटनेमुळे केज परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी थेट पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर