ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

तात्पुरता दिलासा:जीवघेण्या उकाड्यानंतर पावसाच्या सरी, दहा ते पंधरा मिनीटाच्या पावसाने अनेक भागात वीज खंडित‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तब्बल महिनाभराच्या जीवघेण्या उकाड्यानंतर आज अमरावतीकरांना पावसाने तात्पुरता दिलासा दिला खरा, पण त्याचसोबत महावितरणच्या ‘ढिसाळ’ कारभाराचे वाभाडेही काढले आहेत. मंगळवारी (दि. २६) दुपारी तीन वाजताच्या सुमारास शहरात जवळपास सर्वच भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, केवळ १० ते १५ मिनिटे पडलेल्या या पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून शहरातल्या अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. मागील काही दिवसांपासून अमरावती शहर जणू उष्णतेच्या भट्टीत भाजून निघत होते. नागरिक जीवघेण्या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. सोमवारी दुपारी शहरातल्या एक-दोन भागांत पावसाचे तुरळक थेंब पडले खरे, परंतु तो पाऊस अत्यंत अल्प असल्याने नागरिकांना उकाड्यापासून अजिबात दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे आज, मंगळवारी सर्वच भागांत कोसळलेला हा पाऊस महिनाभराच्या तीव्र उष्णतेनंतरचा ‘पहिला तात्त्पुरता दिलासादायक पाऊस’ ठरला. या पावसाने हवेत काही काळासाठी गारवा निर्माण केला आणि अमरावतीकरांनी तब्बल तीन आठवड्यानंतर दुपारच्यावेळी रस्त्यांवर काही क्षणासाठी का होईना गारव्याचा अनुभव घेतला होता. मान्सूनपूर्व नियोजन चर्चेपुरतेच केवळ १५ मिनिटांच्या सामान्य पावसाचा ताणही सहन न करू शकणारी यंत्रणा घेऊन महावितरण आगामी मान्सूनला कसे तोंड देणार, हा मोठा प्रश्न आहे. पहिल्याच पावसात उडालेला हा गोंधळ पाहता, महावितरणचे मान्सूनपूर्व नियोजन केवळ चर्चेपुरतेच आहे का? असा सवाल अमरावतीकरांसमोर आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर