ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मोबाइलला दूर ठेवत बालदोस्त “हसत खेळत’ रमले रंगमंचावर:अंगिक अभिनय, संवादफेकीचे गिरवले धडे;शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांची रंगमंचीय भीती दूर करण्यासाठी बालरंगभूमी परिषद अहिल्यानगर शाखेतर्फे “हसत-खेळत बालनाट्य’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी जिल्ह्यासह पुण्यातूनही बालकलाकारांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराच्या समारोप प्रसंगी बालदोस्तांनी स्वतःच सूत्रसंचालन करत गणेशवंदना, नाट्यछटा आणि बालएकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुलांचा वाढलेला आत्मविश्वास आणि सादरीकरण पाहून उपस्थित पालक थक्क झाले होते. १२ दिवस चाललेल्या या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने अभिनयाचे प्राथमिक धडे दिले. “केवळ अभिनयच नाही, तर मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा आणि त्यांच्या मनात नाट्यकलेप्रती ओढ निर्माण व्हावी, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे,” असे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद भणगे यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक-अभिनेते पूर्णानंद वांढेकर यांनी सहभागी कलाकारांच्या पालकांचे विशेष कौतुक केले. या समारंभाला कार्यवाह सतीश लोटके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी संयोजक सपना साळुंके यांच्यासह श्रीया देशमुख, टीना इंगळे, सोनाली दरेकर, विराज अडगटला, देवीप्रसाद सोहोनी, तेजा पाठक, नाना मोरे, प्रशांत सूर्यवंशी आणि अविनाश बोधले यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले. मुलांनीच घडवली “चेटकिणीची छडी’ शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी स्वतः सुचवलेल्या विषयावर, स्वतःच लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या आणि सादरीकरण केलेल्या “चेटकिणीची छडी” या बालनाट्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. ज्येष्ठ अभिनेते श्रेणिक शिंगवी यांनी बालदोस्तांच्या या कल्पकतेची प्रशंसा केली. प्रशिक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी सतीश लोटके, अभिनेते संकेत खेडकर, सृज्ञ टोंपे, चित्रकार सुजाता पायमोडे, नृत्यदिग्दर्शक सागर अलचेट्टी आणि दिग्दर्शक शैलेश देशमुख यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कुमारी वेदिका हिने अनुभव व्यक्त करताना, “हे शिबिर कायम आठवणीत राहील आणि येथे अनेक नवीन मित्र जोडले गेले,” अशा भावना व्यक्त केल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर