ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

नालेसफाईची पाहणी करणाऱ्यांना त्याच नाल्यात अंगठे धरून उभं केलं पाहिजे:महापौरांच्या दौऱ्यात मॅनहोल उघडेच कसे? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संदीप देशपांडे

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईत पहिल्याच पावसाने पाणी साचल्याने मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईची पाहणी करण्याचे नाटक करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याच नाल्यांमध्ये अंगठे धरून उभे केले पाहिजे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. संदीप देशपांडे यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मराठी माणसांवर दादागिरी केल्याचा आणि अनेक घोटाळे केल्याचा थेट आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मेहतांवर काय कारवाई करणार? ते ‘नरेश’ आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालणार की शिक्षा देणार, हे आता पाहावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, नालेसफाई पारदर्शक झाल्याचा दावा करणाऱ्या अमित साटम यांनाही पायाची बोटे धरायला लावून नाल्यात उभे केले पाहिजे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या कारणांवरूनही त्यांनी आक्षेप घेतला. महापौरांना ट्रोल केलं, पण भ्रष्ट अधिकारी मोकाटच महापौर स्वतः पाहणी दौऱ्यावर जातात, तिथे मॅनहोल उघडे दिसतातच कसे?” असा सवाल करत देशपांडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या ढिसाळ कारभारासाठी महापौरांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले, पण मॅनहोल उघडे ठेवणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मूळ दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? सत्ताधारी पक्ष या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी का घालत आहे? त्यांचे काही आर्थिक लागेबांधे आहेत का? असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला. तोपर्यंत मुंबईची परिस्थिती सुधारणार नाही मनपाचे सर्व अभियंते भ्रष्टाचारी असल्याचा पुनरुच्चार करत देशपांडे म्हणाले की, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होत नाही, तोपर्यंत मुंबईची परिस्थिती सुधारणार नाही. तसेच, राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि संपुष्टात येत चाललेल्या सामाजिक संवेदना यावरही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर