ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर, नाशिकमध्ये संशयितांच्या जामीन अर्जावर 25 जूनला निर्णय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड‌्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली. संशयित कारागृहाबाहेर आले तर पीडितेच्या जिवाला धोका असल्याचा युक्तिवाद करत जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने न्यायालयात केली. शुक्रवारी नाशिक रोड न्यायालयात निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. जामीन अर्जावर २५ रोजी निर्णय होणार आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. गायकवाड, पीडितेच्या वतीने ॲड. मिलिंद कुरकुटे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयात ‘इन कॅमेरा’ सुनावणी झाली. दानिश शेख याने पीडितेशी जवळीक साधताना अविवाहित असल्याचे सांगितले होते. तपासात दानिश याचे २०१८ मध्ये लग्न झाल्याचे उघड झाले. विवाह नोंदणी प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. तरी त्याने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे सिद्ध झाले. पीडितेच्या धर्मांतराचा मोठा कट रचला होता. संशयितांनी संगनमत करत मोबाईलमध्ये धर्मांतराचे ॲप डाऊनलोड करायला लावले. यात तारीक जमालचे व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत. निदा खान, तौसिफ अत्तारच्या वतीने ॲड. राहुल कासलीवाल, दानिश शेखच्या वतीने ॲड. फहीद वासीद यांनी युक्तिवाद केला. बुरखा, धार्मिक पुस्तके जप्त निदा खानने पीडितेचे ब्रेनवॉश करून बुरखा दिला. दानिशने मुस्लिम धार्मिक पुस्तके दिली, पीडितेच्या धर्मांतरासाठीची काही कागदपत्रे पोलिसांनी दानिश शेखच्या याच्या पत्नीच्या भावाच्या ताब्यातून जप्त केली. यातून पीडितेच्या सक्तीने धर्मांतराचा पूर्वनियोजित कट होता हे प्रथमदर्शनी स्पष्ट होतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर