ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिकेत अनियमितता; मंत्र्यांची विधानसभेत कबुली:दोषींवर कारवाई करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती येथील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी दरमहा सुमारे 8 लाख रुपयांचे भाडे देऊन करण्यात आलेल्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करताना भाडे निश्चित करताना कोणते निकष वापरण्यात आले, कोणत्या अधिकाऱ्याच्या आयडीवरून अर्ज स्वीकारण्यात आला, संबंधित इमारत अधिकाऱ्यांच्या नावावर आहे का, तसेच इतका मोठा खर्च करूनही विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा का झाला नाही, याबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. अनियमितता झाल्याचे मंत्र्यांनी केले मान्य यावेळी आदिवासी विकास मंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताना या प्रकरणात अनियमितता झाल्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांच्या गरजेतून तात्पुरती व्यवस्था म्हणून अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. संबंधित करार अटी-शर्तींसह करण्यात आला होता. मात्र त्रुटी आढळल्यानंतर संबंधित गृहपालाला निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यावर विजय वडेट्टीवार यांनी केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, असे सांगितले. प्रादेशिक अधिकारी आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ..तर कारवाई करण्यात येईल विद्यार्थ्यांच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला असेल तर त्याची संपूर्ण चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता पुन्हा होणार नाहीत याची सरकारने खात्री द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. मंत्र्यांनी या प्रकरणातील अनियमितता दूर करण्यासाठी आयुक्त स्तरावर समिती गठित करण्यात आली असून चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले तसेच संबंधित भाडेकरारही रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर