ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

विरोधी खासदारांना विकास निधी नाकारल्यास काँग्रेसचा सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा:निधी मिळत नव्हता हे सांगणे म्हणजे सरकारचीच पोलखोल- गोपाळ तिवारी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधारी भाजप-महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास निधी अडवून सूडबुद्धीचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. ही वागणूक अशीच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील जनता ‘सविनय कायदेभंग’ आणि ‘असहकार आंदोलन’ पुकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हटले की, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून जनतेने ज्या खासदारांना निवडून दिले, त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करणे हा मतदारांशी केलेला विश्वासघात आहे. हे खासदार पक्षबदलाचे समर्थन करताना ‘विकास निधी मिळत नव्हता आणि कामे खोळंबली होती’ असे कारण देत आहेत. हा प्रकार म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची पोलखोल असून, विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या जनतेवर सूड उगवण्याचा प्रयत्न आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेचा उल्लेख करत तिवारी म्हणाले की, प्रत्यक्षात मात्र दुटप्पीपणाची वागणूक दिली जात आहे. लोकशाहीत जनतेने निवडणुकीद्वारे विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना कौल दिला, जेणेकरून ते सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवू शकतील. मात्र, अशा मतदारसंघांचा निधी रोखून लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला 31 जागांवर, तर भाजप-एनडीएला 17 जागांवर विजय मिळवून दिला. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या वाट्याचा विकास निधी रोखणे हा देशात सर्वाधिक राष्ट्रीय महसूल व जीएसटी देणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. जर महाराष्ट्राच्या जनतेला अशी वागणूक दिली जात असेल, तर जनता सरकारी कर न भरण्याची भूमिका घेऊन सविनय कायदेभंग व असहकार आंदोलन पुकारेल, असा इशारा तिवारी यांनी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर