ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राहुरी मतदानाच्या दिवशीच प्राजक्त तनपुरेंची स्पष्ट भूमिका:भाजप प्रवेशाच्या अफवा फोल, तनपुरे अजूनही पवारांसोबतच

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट सांगितले की, ते कोणत्याही नव्या पक्षात जाणार नसून ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याच भूमिकेत ठाम आहेत. राहुरी पोटनिवडणुकीपासून तनपुरे काहीसे दूर राहिल्याचे चित्र दिसत होते. यावर त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही केवळ पोटनिवडणूक असल्यामुळे सरकारच्या सत्तासमीकरणावर त्याचा काहीही परिणाम होणार नव्हता. शिवाय कर्डिले यांच्या निधनामुळे या निवडणुकीला दुःखाची छाया आहे. त्यामुळे राजकीय आक्रमकता न दाखवता सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारकडून मदत घेणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका दिसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. बारामतीत शरद पवार गटाने उमेदवार दिला नाही, मात्र राहुरीत उमेदवार उभा केला. यावर तनपुरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका होती. मात्र काँग्रेसकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भविष्यात त्या जागेवर दावा निर्माण होऊ शकतो, या शक्यतेमुळेच पक्षाने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असावा. भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चांवर त्यांनी ठामपणे उत्तर दिले. मी कधीही भाजपमध्ये जाणार असल्याचे बोललो नाही. या केवळ अफवा आहेत, असे ते म्हणाले. या निवडणुकीत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली असली तरी कोणत्याही पक्षाच्या प्रचारमंचावर ते गेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच कार्यकर्ता आहे, असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय निष्ठेबाबत कोणतीही शंका राहू दिली नाही. काल आलेला निकाल हा केवळ योगायोग दरम्यान, साखर कारखाना व्यवहाराशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून ईडीकडून त्यांची मुक्तता झाल्यानेही राजकीय चर्चांना उधाण आले होते. याबाबत त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध नाही. वर्षभरापूर्वीच या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता आणि तीन महिन्यांपूर्वी न्यायालयाने तो स्वीकारला होता. काल आलेला निकाल हा केवळ योगायोग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर