ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण बंद झाले पाहिजे:देवेंद्र फडणवीसांनी सर्वांनाच खडसावले; म्हणाले- यातून राजकारण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या संदर्भात होत असणारा वाद हा अतिशय निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच राजकारण यात कसं पाहता येईल, हा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे अतिशय चुकीचे आहे. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे एक मोठे नेते, अजित दादा पवार हे दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. अशा प्रकारचे खालचे राजकारण बंद झालं पाहिजे, असे ठाम मत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेतून काहीजण राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनतेत लोकप्रिय असलेले नेते अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करणे अत्यंत चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. या घटनेतून राजकारण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. हे खालच्या पातळीचे राजकारण तात्काळ थांबले पाहिजे, असा कडक इशाराही त्यांनी दिला. मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभेसाठी रवाना झाले असताना अजित पवार यांच्या विमानाचा धावपट्टीजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये विमान कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. तपासासाठी केंद्रीय पथक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीवरूनही चर्चा रंगल्या. मात्र, फडणवीसांनी स्पष्ट केले की, या सर्व घडामोडींमध्ये अनावश्यक राजकीय अर्थ लावणे योग्य नाही. दु:खद प्रसंगात संयम राखणे आणि कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. विदर्भाला औद्योगिक केंद्र करण्याच्या प्रयत्नांना बळ विदर्भाच्या औद्योगिक क्षमतेला नवी चालना मिळणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ₹15,000 कोटींच्या गुंतवणुकीचे स्वागत केले. नागपुरात उभारल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक वाहन आणि ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ या कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आणि विदर्भाला औद्योगिक केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या राज्याच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. संभाजीनगर येथे 150 एकरांवर सप्लायर पार्क महिंद्रा समूह नागपूरमध्ये 1,500 एकर क्षेत्रावर अत्याधुनिक एकात्मिक ऑटो आणि ट्रॅक्टर उत्पादन सुविधा उभारणार आहे. या प्रकल्पासोबतच संभाजीनगर येथे 150 एकरांवर सप्लायर पार्क विकसित करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दरवर्षी 5 लाखांहून अधिक वाहनांचे आणि 1 लाख ट्रॅक्टरचे उत्पादन येथे होणार आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर विदर्भाचे स्थान अधिक ठळक होणार आहे. वाहनउद्योग, शेती उपकरणे, तंत्रज्ञान आणि सप्लाय चेन या सर्व क्षेत्रांना या प्रकल्पातून चालना मिळेल. महिंद्राच्या या विस्तारामुळे नवकल्पना, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत उत्पादन पद्धतींना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्याला उत्पादन क्षेत्रात अग्रस्थानावर नेण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर