ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पंतप्रधानांना 12 वर्षे पूर्ण, पण देशाचे 12 वाजले!:मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाची बरोबरी केली तरी त्यांची उंची गाठू शकत नाहीत- विजय वडेट्टीवार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दीर्घ पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची बरोबरी केली असली, तरी ते नेहरूंची वैचारिक उंची कधीच गाठू शकत नाहीत. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाचे पूर्णपणे 12 वाजले असून जनता महागाई आणि बेरोजगारीने हैराण झाली आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारला ओबीसींची स्वतंत्र जनगणना करायची नाही. त्यांचे कारण काय आहे माहिती नाही. कदाचित सरकारला भीती असेल की संख्या पुढे आली तर त्यानुसार सर्व गोष्टी द्याव्या लागतील. सरकारने देशाला कंगाल केले आहे. आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच गोष्टीमध्ये आमचा वाटा मिळायला हवा. जितकी लोकसंख्या आहे त्या तुलनेत भागीदारी दिली पाहिजे. यासाठी जनगणना केली पाहिजे. आम्ही काय सरकारच्या बापाचे बांधलेले आहोत काय? आमचा ओबीसींचा कॉलम ठेवला तरच आम्ही सहकार्य करू. सरकारला जर गुन्हे दाखल करायचे असतील तर त्यांनी गुन्हे दाखल करावे. ..तर आम्ही जेलभरो आंदोलन करू विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने जर आमचा कॉलम दिली नाही आणि माहिती न दिल्यावर गुन्हे दाखल करायचे ठरवले तर आम्ही सर्व ओबीसी मिळून जेलभरो आंदोलन करू. आमच्या हक्काचे तुम्ही देणार नसताल तर आम्ही जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत. ‘ओबीसी कॉलम’ नसल्यास जनगणनेवर बहिष्कार! विजय वडेट्टीवार म्हणाले की, जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम नाही. जनगणनेची पहिली फेरी ही संपत आली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही ओबीसींचा कॉलम ॲड करणार असे सरकार सांगितले जात आहे. मात्र मोदी सरकार हे काही करणार नाही. ओबीसींची संख्या किती आहे हे सरकार पुढे येऊ देणार नाही. यामुळे ओबीसींच्या हक्काचे जे काही आहे ते मिळणार नाही. ओबीसींची जनगणना करणार असे सांगण्यात आले पण तसे कॉलम देण्यात आले नाही. भंडारा जिल्ह्यात ओबीसी जनगणनेवर बहिष्कार टाकला जात आहे. अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. आम्ही देशभरात आंदोलन करण्याची तयारी सुरू करत आहोत. जर ओबीसी कॉलम केला नाही तर आम्ही सहकार्य करणार नाही. सरकार ओबीसींचे मते घेतात पण त्यांच्यासाठी काहीच काम करत नाही. ओबीसी डीएनए आहे म्हणणारे मुख्यमंत्री काही का करत नाही? असा सवाल सुद्धा वडेट्टीवर यांनी केला आहे. सरकारने आमच्यासोबत बेईमानी केली आहे. जनतेला सिलिंडरची किंमत परवडेनाशी विजय वडेट्टीवार म्हणाले की, मोदी सरकारने उज्ज्वला योजनेचा मोठा गाजावाजा केला, पण आज वाढत्या गॅस दरांनी गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांचे कंबरडे मोडले आहे. ज्या महिलांना धुरापासून मुक्तीचे स्वप्न दाखवले गेले, त्याच महिलांना आज पुन्हा चुलीच्या धुरात जीवन जगण्याची वेळ आली आहे. एकेकाळी 12 अनुदानित सिलिंडर देण्याची घोषणा करणारे सरकार आज तेच लाभ कमी करत करत केवळ 4 सिलिंडरपर्यंत घेऊन आले आहे. महागाईने त्रस्त असलेल्या कुटुंबांना हजार रुपयांच्या आसपास पोहोचलेल्या सिलिंडरची किंमत परवडेनाशी झाली आहे. जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च विजय वडेट्टीवार म्हणाले की, उज्ज्वला योजनेची जाहिरात करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाले, पण गरीब महिलांच्या घरात गॅस टिकवण्यासाठी आवश्यक धोरण मात्र तयार झाले नाही. परिणाम असा की, लाखो महिलाना पुन्हा लाकूड, कोळसा आणि चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. 12 वर्षांच्या मोदी सरकारचा हा खरा चेहरा आहे घोषणा मोठ्या, जाहिराती भव्य, पण सामान्य जनतेच्या आयुष्यात काडीचा फरक नाही! महिलांना धूरमुक्त जीवनाचे आश्वासन देणारे सरकार आज त्यांनाच पुन्हा धुराच्या विळख्यात ढकलत आहे,त्यामुळे मोदी सरकारची ही योजना म्हणजे एक जुमला ठरली!वाह मोदी जी वाह… असे ट्विट करत मोदींवी निशाणा साधला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर