ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का?:भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका- कैलास पाटील

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी त्यांनी कृषिमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमदार कैलास पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, शेतकरी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ हौसेने घेत नाही. गरज असल्यामुळे तो अर्ज करतो. कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाखो शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने अर्ज केले. मात्र ज्या दिवशी लाभार्थ्यांची लॉटरी जाहीर झाली, त्याच दिवशी त्रुटी पूर्तीसाठी आवश्यक असलेली वेबसाईट बंद होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? वेबसाईट उपलब्ध नसताना त्रुटीची पूर्तता करायची कशी? प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? असा सवाल कैलास पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, अखेर याच कारणावरून तब्बल 94 टक्के अर्ज रद्द करण्यात आले. हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय असून सरकारने स्वतःची चूक शेतकऱ्यांच्या माथी मारली, असा आरोप पाटील यांनी केला आहे. तांत्रिक अडचणींच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडले जातेय कैलास पाटील म्हणाले, सरकार मोठमोठ्या घोषणा करते, जाहिरातींमध्ये योजनांचा गाजावाजा करते; पण प्रत्यक्ष लाभ देण्याची वेळ आली की नियम, अटी आणि तांत्रिक अडचणींच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडते. सरकारने लाखो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्याऐवजी त्यांना पुन्हा संधी द्यावी, त्रुटी पूर्तीसाठी वेबसाईट सुरू करावी आणि पात्र शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचा लाभ द्यावा, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली आहे. कर्जमाफी की कर्जवसूली? दरम्यान, कर्जमाफीवरून देखील कैलास पाटील यांनी टीका केली होती. कर्जमाफी की कर्जवसुली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकारने 2024 पासून कर्जमाफीचा अभ्यास करून 2026 मध्ये घोषणा केली. मात्र अटी-शर्तीच्या जंजाळामुळे ही कर्जमाफी आहे की कर्जवसूली, असा प्रश्न शेतकरी विचारात आहे. सरकारने दिखाऊ घोषणा नव्हे, तर अटी-शर्ती विना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी देखील पाटील यांनी विधानसभेत बोलताना केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर