ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महाराष्ट्रात निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही:हर्षवर्धन सपकाळ यांचे सूचक विधान, बारामती पोटनिवडणुकीत पेच वाढणार?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. “महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची कोणतीही परंपरा नाही. अपवादात्मक परिस्थिती वगळता राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका लढवल्या जातात,” असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार की गाजणार, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बारामतीत विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वीच या निवडणुकीची घोषणा केली. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असा दावा केला जात होता. तसे सर्वच राजकीय पक्षांनी संकेतही दिले होते. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने येथून अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर बिनविरोध निवडणूक करण्याची कुठलीही परंपरा नाही. अपवादात्मक काही किरकोळ गोष्टी सोडल्या, तर सर्वसाधारणपणे ज्या ज्या ठिकाणी पोटनिवडणुका होतात, त्या ठिकाणी दोन्ही बाजुंनी निवडणूक लढली जाते. नांदेडमध्ये खासदार म्हणून वसंतराव चव्हाण हे निवडून आले होते. त्यांच्या मृत्युनंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपने आपला उमेदवार उतरवला होता. त्यामुळे अशा पद्धतीची परंपरा नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. निवडणुका झाल्यास त्यात वावगे काही नाही अजितदादांचा मृत्यू हा दु:खद आणि धक्कादायक नक्कीच आहे. मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने यामध्ये अशी परंपरा नसल्यामुळे आणि हा एक राजकीय परिस्थिती असल्यामुळे यामध्ये निवडणुका होण्यामध्ये कुठल्या प्रकारची हरकत नसावी. सर्वसाधारणपणे राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका होतात. यावेळी देखील निवडणुका झाल्या तर त्यात चुकीचे किंवा वावगे काही नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. शरद पवार गटाशी कोणतीही चर्चा नाही विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहेत. यावर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाशी थेट स्वरुपात तशा पद्धतीची चर्चा झालेली नाही. ऐकीव माहितीच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. निवडणूक बिनविरोध होण्याला विरोध असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशापद्धतीची परंपरा नाही. शेवटी राजकीय भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. आता राजकारण बरेच पुढे चालले गेलेले आहे. त्यामुळे पक्ष म्हणून काही भूमिका घ्याव्या लागतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर