ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी विनामूल्य प्रशिक्षण!:’SIAC’ तर्फे 2 ऑगस्टला राज्यव्यापी सामायिक प्रवेश परीक्षा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET-2026-27) आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उच्च शिक्षण विभागअंतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) मुंबईसह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर, तसेच यशदा संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी, पुणे या संस्थांमार्फत प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे : विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलद्वारे पसंतीचे प्रशिक्षण केंद्र निवडण्याची सुविधा दिली जाणार आहे. या संदर्भात www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती, अभ्यासक्रम, पात्रता,अर्ज प्रक्रिया व इतर सूचना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर