ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

दाभड येथे वृद्ध महिलेचा खून:शेतात जाताना डोक्यात दगड घालून हत्या, तपास सुरू; विहिरीलगत सापडला मृतदेह

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे बुधवारी एका वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. पार्वतीबाई सूर्यवंशी असे मृत महिलेचे नाव आहे. शेतात जाताना त्यांचा खून करण्यात आला. दाभड येथील रहिवासी पार्वतीबाई सूर्यवंशी (75) 28 जानेवारी रोजी सकाळी शेताकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी पोहोचल्या नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहणी केली असता त्या शेतातही दिसल्या नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह दाभड शिवारातील एका विहिरीजवळ आढळला. चोरीच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सपोनि, दत्तात्रय मनठाळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. पार्वतीबाई सूर्यवंशी यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण हा प्रकार चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा दावा केला जात आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक तपास पथकाच्या माध्यमातूनही तपास केला जात आहे. पार्वतीबाई सूर्यवंशी यांच्या मृत्यूपूर्वीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात त्या एका तरुणासोबत जाताना दिसून येत आहेत. हा तरुण येथीलच एका ढाब्यावर काम करणारा असल्याचे समजते. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर