ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

उबाठाला राऊत नावाची कीड लागली,बाजूला केली नाही तर नुकसान वाढणारच:शिवराळ भाषा सर्वांना येते, पण ती कुठे वापरावी हे राऊतांना समजत नाही- नीलेश राणे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवराळ भाषा सर्वांना येत असते पण ती कुठे वापरली पाहिजे हे समजले पाहिजे. उबाठाला संजय राऊत नावाची कीड लागली आहे. उद्धव ठाकरे ही कीड जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत हे नुकसान अजून वाढत जाणार आहे. लोकं स्वत:हून आमच्याकडे येत असतील आणि त्यांच्यासाठी राऊत ही भाषा वापरत असतील तर उद्धव ठाकरेंचे नुकसान करत आहेत की फायदा हे त्यांनी ठरवले पाहिजे, असे शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी म्हटले आहे. नीलेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडून चांगले बोलण्याची काय अपेक्षा ठेवणार आहोत. ज्यांनी काही स्वत: कमावलेले असते त्यांना वाटते की आपण लोकांना जवळ करावे, लोकांना परत बोलवावे. यांनी स्वत: काहीही कमावलेले नाही त्यामुळे यांना वाटते की सर्वांनी जावे आणि माझ्याच हातात सर्व काही असावे. शिवसेना यांनी कुठेच उभी केली नाही, त्यांनी कोणत्याही ठिकाणी संघटनात्मक बांधणी केली नाही किंवा निवडणूक सुद्धा लढवली नाही.
राऊत शिवसेनेचे कधीच नव्हते नीलेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांना राज्यसभा मिळते तिथे त आरामात बसतात. शिवसेना म्हणजे संघर्षांचे दुसरे नाव आहे. जेव्हा संघटना वाढत होती त्यावेळी संजय राऊत कुठे होते. शिवसेना राहिली काय अन् संपली काय, उद्धव ठाकरे राहिले काय नाही राहिले तरी संजय राऊत राहिले पाहिजे आणि त्याचसाठी राऊत काम करतात त्यातूनच ते अशी भाषा वापरतात, ही काय भाषा आहे का? ते जनतेमधून निवडून तर येत नाही. राज्यसभेची त्यांची दुसरी किंवा तिसरी टर्म असेल त्यांना लोकांना शिव्या देत काय साध्य करायचे आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मदत होईल की नुकसान होईल याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. उद्धव ठाकरेंवर मी काही बोलू शकत नाही ते काय बोलणार यावर मी काही बोलू शकत नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर