ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले:’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम अन् विकास करणारे मुख्यमंत्री- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देवाभाऊ हे तुमच्यासारखे घरात बसणारे मुख्यमंत्री नाहीत. त्यांना महाराष्ट्राला नंबर एकवर न्यायचे आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते साधे मंत्रालयात जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. देवाभाऊ हे जनतेत सुद्धा असतात आणि दावोसला जाऊन गुंतवणूक सुद्धा आणतात हे त्यांचे काम आहे, घरात बसून पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी हे काय कळणार. तुम्ही स्वत:च्या घरात तुमचा पक्ष क्र एकचा करु शकले नाही याचे भान ठेवा, असे म्हणत मुंबई मनपाचे नगरसेवक तथा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नवनाथ बन म्हणाले की, मुंबईचा महापौर कोण होणार हे संजय राऊत यांनी ठरवायची गरज नाही. मुंबईकरांनी ठरवले आहे की भाजपा आणि महायुतीचा महापौर होणार आहे. राऊतांनी आपल्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. मुंबई आमचा गड असे जे तुम्ही सांगत होतात तो तुमचा गड महायुतीने सर केला आहे. तुमच्या पक्षाचे नगरसेवक तुमच्याकडे राहतील का? पक्षाचे काय होईल याकडे लक्ष द्या. तुमच्या पक्षाला उतरती कळा लागलेली आहे. उगाच दिवा स्वप्न पाहू नका. उबाठा गटाला घसरगुंडीकडे संजय राऊत यांनी नेले आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवले पाहिजे. राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का? नवनाथ बन म्हणाले की, एकनाथ शिंदे हे अंगवस्त्र नाहीत तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सच्चे शिवसैनिक आहेत. तुम्हीच राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का हा माझा सवाल आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांची तुम्ही गुलामी करतात. तर शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले आहे तर उद्धव ठाकरे हिरव्या मतांसाठी गुलामी करण्याचा प्रयत्न करत आहे. पवार- काँग्रेसला धोका दिला नवनाथ बन म्हणाले की, बहुमत कधीच अस्थिर नसते ते कायमच एकजूट असते. अस्थिर काय असते तर ती तुमची भूमिका असते. तुम्ही ज्या पद्धतीन भूमिका बदलत आहात ते महाराष्ट्राने पाहिले आहे.बहुमत मजबूत असते. त्यामुळे आमचा झेंडा मुंबई मनपावर फडकणार आहे. तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसला धोका दिला आहे, आता तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही. ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून लोकं गेली नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊ हे भयाचे नाही तर कायद्याचे आणि विकासाचे नाव आहे. त्याच्यामुळे कोणाला घाबरण्याची गरज नाही. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची काळजी घेतली पाहिजे. भाजपा आणि महायुती अतिशय भक्कम आहे, आमचाच महापौर मुंबई मनपामध्ये होणार आहे. देवाभाऊ हे विकासाने मुंबईला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत, त्यामुळेच सर्वाधिक मनपा निवडून आणल्या. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व गहान ठेवले त्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करु नये. तुमचे आमदार हे काही ईडी सीबीआयला घाबरून गेले नव्हते ते उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून निघून गेले. नगरसेवक फोडण्याची भीती कुणालाही नाही, एकनाथ शिंदेंना देखील नाही, उलट तुमचे किती नगरसेवक तुमच्यासोबत राहतात याकडे लक्ष द्या, हा अहंकार ठेवलात तर नगरसेवकही तुम्हाला सोडून जातील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर