ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

अंगणवाडीच्या कर्मचाऱ्याने नाही तर ‘आईनेच’ केली चिमुरडीला मारहाण:नवी मुंबईतील व्हायरल व्हिडिओचे पोलिसांच्या तपासात उघड झाले सत्य

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवी मुंबईतील एका सरकारी अंगणवाडीत लहान मुलीला निर्दयीपणे मारहाण केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील मारहाण अंगणवाडी कर्मचाऱ्याने केल्याचा दावा केला जात होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात एक वेगळेच आणि धक्कादायक सत्य समोर आले आहे. या चिमुरडीला अंगणवाडी कर्मचाऱ्याने नाही, तर तिच्या सख्ख्या आईनेच मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. भविष्यात अशा प्रकारे मुलीला मारहाण करू नये, अशी सक्त ताकीद पालकांना पोलिसांनी दिली. नेमके काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला एका लहान मुलीला मारहाण करताना आणि लाथ मारताना दिसत होती. या मारहाणीमुळे ती चिमुरडी अंगणवाडीच्या पायरीवरून खाली पडल्याचे स्पष्टपणे दिसत होते. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. पोलिसांच्या तपासात सत्य आले समोर? या व्हायरल व्हिडिओची तात्काळ दखल घेत पनवेल शहर पोलिसांनी सत्यता पडताळून पाहण्यासाठी तपास सुरू केला. पोलिसांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव गावात जाऊन या कुटुंबाचा .अंगणवाडीत शांत बसत नव्हती. त्यामुळे आईला राग आला आणि तिने वैतागून मुलीला मारहाण केली. नेमक्या याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढला आणि तो चुकीच्या दाव्यासह सोशल मीडियावर पसरवला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर