ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

संतापजनक:दफनविधीसाठी बेवारस मृतदेह नेला घंटागाडीतून!, अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील असंवेदनशील कारभारावर व्यक्त होतोय संताप

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते किंवा इमारतींवरून होत नाही, तर तेथील प्रशासन मानवी मूल्यांशी किती संवेदनशीलतेने वागते यावरून ठरते. मात्र, अमळनेर शहरात मानवता काळवंडणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरात आढळलेल्या एका बेवारस मृतदेहाची शवविच्छेदनानंतर दफनविधीसाठी चक्क कचरा वाहणाऱ्या “घंटागाडी’तून वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण रुग्णालयात घडला. नियमानुसार, शहरातील बेवारस मृतदेहांची सन्मानाने विल्हेवाट लावण्यासाठी किंवा दफनविधीसाठी स्वतंत्र आणि योग्य वाहनाची व्यवस्था करणे कचरा संकलन ठेकेदाराला बंधनकारक आहे. असे असतानाही, संबंधित ठेकेदाराने सर्व नियम आणि मानवी संवेदनशीलता धाब्यावर बसवून मृतदेह थेट घंटागाडीत टाकून नेला. दरम्यान, ठेकेदाराविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी दिली. कठोर कारवाई करू कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला बेवारस प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सोय करणे बंधनकारक आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदाराने अक्षम्य चूक केली आहे. या प्रकरणी त्याला नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबत चौकशी होईल. -गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश एकीकडे शहराच्या विकासाच्या मोठ्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे मृतदेहाच्या अंतिम प्रवासाची ही दुरवस्था प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारी आहे. या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर