ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

विद्यापीठात शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’:पेट्रोल-डिझेल वाचवण्याचा निर्धार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियमातून वगळले‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशापुढील संकटाची मालिका लक्षात घेता, येत्या काळात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा भासणार आहे. या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ठरविले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यापीठ स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात एक बैठक पार पडली. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले, देशाच्या विकास कार्यात आपले योगदान देण्यासाठी, समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी विद्यापीठ काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. ‘नो व्हेईकल डे’ हा याच श्रृंखलेचा एक भाग आहे. या दिवशी विद्यापीठ परिसरात कोणीही पेट्रोल किंवा डिझेलची वाहने आणणार नाही. केवळ सायकल व ई-बाईक आणू शकतील. विद्यापीठात बसनेही येता येईल. यामधून दिव्यांग कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासन केवळ याच एका निर्णयावर थांबले नाही. कारपुलिंग व शेअरिंगच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांसाठी एकाच भागातून येणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकाच वाहनाचे शेअरिंग किंवा कारपुलिंग करण्याचा प्रयत्न करावा. असेही या सभेत ठरविण्यात आले. याबाबत विद्यापीठाच्या प्रशासन विभागाकडून तातडीने परिपत्रक काढून सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे. सर्वांनी त्याचे काटेकोरपणे पालन करावे. अशा सूचना याप्रसंगी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी दिल्या. बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख आणि समन्वयक उपस्थित होते. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. शनिवारचे अध्यापनही ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांचे महिन्यातील सर्व शनिवारचे शैक्षणिक कामकाज ऑनलाइन पद्धतीने घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. विविध प्राधिकरणांच्या बैठकीदेखील ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागांतर्गत होणाऱ्या सर्व समित्या आणि उपसमित्यांच्या बैठका प्रत्यक्ष घेण्याऐवजी ऑनलाइन किंवा आभासी पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर