ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हिंगोलीत किरकोळ कारणावरून एकास खंजीरने भोसकले:तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली शहरातील रेल्वेस्टेशन पार्किंग जवळ किरकोळ कारणावरून एकास खंजीरने भोसकल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ३१ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रिसालाबाजार येथील आदित्य सुर्यवंशी याचे त्या भागातील रहिवासी असलेल्या प्रथम कुऱ्हे याच्यासोबत वाद झाला होता. या वादातून त्यांच्यात मागील काही दिवसांत कुरुबुरी सुरु होत्या. त्यातून हाणामारी देखील झाली होती. मात्र प्रकरण मिटविण्यात आले होते. दरम्यान, आदित्य हा शनिवारी ता. ३१ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे पार्किंग येथे कामाला आला होता. त्या ठिकाणी तो काम करीत असतांना प्रथम कुऱ्हे हा त्याचा मित्र अरबाज व विकास खंदारे यांना सोबत घेऊन तेथे आले. त्याने किरकोळ कारणावरून सुरु असलेला वाद उकरून काढला. यावेळी त्यांच्या शाब्दीक चकमकीनंतर हाणामारी झाली. यामध्ये प्रथम याने आदित्य यास जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात, गळ्यावर खंजीरने वार केले. अचानक खंजीरने होणारे वार अडविण्याच्या प्रयत्नात आदित्य याच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. तर अरबाज याने दगडफेकून मारला तर विकास याने टोकदार हत्याराने आदित्य याच्या डोक्यात व उजव्या हातावर वार केले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आदित्य यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येेथे हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार, उपनिरीक्षक वाघमारे, राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शंकर ठोंबरे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, राहुल जोगे, अझहर पठाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर