ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

‘काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलतं…’:सुप्रिया सुळेंची साडी ठरतेय चर्चेचा विषय, छत्रपती संभाजीनगरच्या विणकराचे मानले आभार

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावनिक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. 20 जून रोजी त्यांची कन्या रेवती आणि नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांचा विवाहसोहळा पार पडला. या विशेष प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी परिधान केलेल्या पैठणी साडीला एक अनोखा भावनिक इतिहास लाभला आहे. कारण तब्बल 35 वर्षांपूर्वी, म्हणजेच 4 मार्च 1991 रोजी त्यांनी स्वतःच्या लग्नात वधू म्हणून हीच पैठणी नेसली होती. आता इतक्या वर्षांनंतर ‘नवरीची आई’ म्हणून स्वतःच्या मुलीच्या लग्नात तीच ऐतिहासिक पैठणी पुन्हा एकदा परिधान करण्याचा सुंदर आणि दुर्मिळ योग आल्याचा आनंद सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, मुलांचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. सुमारे 35 वर्षांपूर्वी, 4 मार्च 1991 रोजी ‘वधू’ म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी ‘नवरीची आई’ म्हणून रेवती आणि सारंग यांच्या 20 जून रोजी झालेल्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आला. ही पैठणी छत्रपती संभाजीनगर येथील विणकर बशीरजी यांनी अत्यंत कौशल्याने विणलेली आहे. ती पुन्हा नेसताना अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि आनंदात आणखी भर पडली. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलत जातं. या पैठणीत केवळ रेशमाचे धागे नाहीत, तर आठवणी, संस्कृती आणि आपल्या कारागिरांच्या कष्टांची समृद्ध परंपरा विणलेली आहे. म्हणूनच ही साडी नेसताना मी कारागिरांच्या अविश्रांत मेहनतीप्रती कृतज्ञ आहे. काही गोष्टींचं मोल कशातही चुकविता येत नाही, हेच खरं आमच्या आयुष्यातील हे क्षण अधिक सुंदर करणाऱ्या सर्व प्रतिभावान विणकरांचा अतिशय अभिमान आहे, अशा भावना सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर