ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

‘मराठा समाजाचा कार्यक्रम, तुम्ही बसलात तर वाद होईल’:अभिमन्यू पवारांच्या विधानावर मेधा कुलकर्णींचा संताप; ताईंचा गैरसमज झाला- पवार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘सारथी’ संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील नाराजीनाट्य समोर आले आहे. पहिल्या रांगेत बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी थेट मंचावरून निघून गेल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणावर आमदार पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर, मेधा कुलकर्णी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत, “मी अभिमन्यू पवार यांना माफ करते, मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा सूचक सल्ला दिला आहे. खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांचे अभिनंदन करण्यासाठी चांगल्या मनःस्थितीत मी त्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमात पहिल्या रांगेत काही रिकाम्या खुर्च्या होत्या. माधुरीताई किंवा अन्य मंत्रीमहोदय आलेले नव्हते त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या. अधिकारी म्हणत होते, जर त्या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णी यांचा प्रोटोकॉल आहे. माझ्याकडे एका कमिटीचे अध्यक्षपद आहे, म्हणून ते मला म्हणत होते इथे बसा, मी म्हणाले की नरेंद्र पाटीलही बसू शकतात, महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जात बघून बसण्याची रचना केलेली नसते पुढे मेधा कुलकर्णी म्हणाल्या, अभिमन्यू पवारांना तिथे बसायचे होते, म्हणून धावाधाव चालली होती, मी बसतो तर अधिकारी म्हणाले की यांच्यानंतर मेधा कुलकर्णींचे नाव येते तर ते (अभिमन्यू पवार) असे म्हणाले की, हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही इथे बसलात तर वाद होईल. हा कार्यक्रम नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्वान मराठा समाजातील मुलांचा आहे, त्यांना शाबासकी देण्याचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम शासनाचा आहे, शासकीय प्रोटोकॉल नुसार खुर्च्यांची रचना केलेली असते. जात बघून रचना केलेली नसते. अभिमन्यू पवारांसाठी मी ब्राह्मण समाजात प्रचार केला मी कुठेही गेले तरी हिंदू म्हणून जगले पाहिजे, असे आवाहन करते जातीचा विषय आला कुठे? असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, अभिमन्यू पवार जेव्हा निवडणुकीला सामोरे जात होते, तेव्हा त्यांनी माझ्याकडे या ब्राह्मण समाजाचा मेळावा ठेवणार आहे, असे म्हटले. तब्येत ठीक नव्हती तरी लांबचा प्रवास करुन त्यांच्यासाठी गेले. ब्राह्मण समाजाला अभिन्यूजींच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. समाजाचा प्रश्न येत नाही, सगळ्यांनी विचारांच्या पाठीशी राहिले पाहिजे, असे आवाहन त्या कार्यक्रमात केले होते. मला सफोकेट झाले आणि मी निघाले आज देशात परिस्थिती वेगळी आहेत, आव्हाने वेगळी आहेत, प्रश्न वेगळी आहेत. ज्याला उत्तर देण्यासाठी हिंदू समाज येईल का हा मुद्दा आहे. एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे. कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरुन बोलताय, मला सफोकेट झाले, मला चुकीचे वाटले, मी तिथून निघून आले, असे मेधा कुलकर्णींनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनाही भेटू दिले नाही कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस लाऊंजमध्ये बसले होते. तिथे मराठा समाजातील बांधव माझ्यासोबत होते, त्यांना घेऊन गेले होते. अभिजीत पवार त्यांना आत घेऊ नका, असे म्हणत होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलले, अभिमन्यूजी तुम्हाला ओएसडी समजता का?, असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी केला. हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही बसलात तर वाद होईल, याचा आणखी वेगळा कोणता मतितार्थ आहे हे सांगा, असा सवालही मेधा कुलकर्णी यांनी केला. यात कुठल्याही जातीचा विषय नाही, ताईंचा गैरसमज झाला- अभिमन्यू पवार आमदार अभिमन्यू पवार यांनी या नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ताईंचा गैरसमज झाला आहे. मी त्यांना एवढेच म्हटले की, नरेंद्र पाटील पुढे बसतील. कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघे मागे बसू. मी त्यांना एवढेच बोललो आहे. यात कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही. मी काय बोललो ताईला तरी देखील विनंती करतो की, तुम्ही मी काय बोललो ते आठवून बघा. पुढे बोलताना अभिमन्यू पवार म्हणाले, हा कार्यक्रम माझ्या घरचा नाही, त्या माझ्या पक्षाच्या नेत्या आहेत, वरिष्ठ आहेत, यानंतर देखील माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तर कार्यक्रमातून निघून जायचे की बसावे हा त्यांचा विषय आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर