ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

इंधन दरवाढीविरोधात अमरावतीत काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने:ग्रामीण भागात खदखद; डिझेलच्या महागाईने शेतकरी होरपळणार‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्र सरकारच्या वतीने सलग चौथ्यांदा करण्यात आलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज, मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महागाईचे भीषण संकट ओढवले असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “संपूर्ण देश महागाईच्या आगीत होरपळत असताना देशाचे पंतप्रधान मात्र विदेश दौरे करण्यात आणि ‘मेलोडी’ चॉकलेटचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणारे हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.सलग चार वेळा झालेल्या दरवाढीमुळे अमरावतीत इंधनाचे दर वाढल्याचे आंदोलकांनी सांगितले. पेट्रोल (प्रति लिटर) १०५ वरून ११२ झाले. डिझेल (प्रति लिटर) ९० वरून ९८ झाले आहे. केंद्र सरकारच्या निष्काळजी आणि ढासळलेल्या आर्थिक कारभारामुळे आज संपूर्ण देशावर हे संकट आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढेल. दैनंदिन गरजेच्या वस्तू आणखी महागणार आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहिली, तर सर्वसामान्यांचे जगणे असह्य होईल, असे मतही यावेळी उपस्थित आंदोलकांनी व्यक्त केले. त्यामुळेच केंद्र सरकारने ही अन्यायी इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी. अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह मनपा विरोधीपक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक विक्की वानखडे, युवक काँग्रेसचे निलेश गुहे, नितीन काळे, अनिकेत ढेंगळे, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, विनोद मोदी, राजेंद्र वर्मा, संजय चौधरकर, सलीम मिरावाले, अरुणकुमार जैस्वाल, माजी महापौर अशोक डोंगरे, अभिनंदन पेंढारी, गजानन जाधव, गजानन राजगुरे, विठ्ठल मरापे, संजय बोबडे, अमोल उगे, अरुण बनारसे, संदेश सिंघई, शिल्पा राऊत, कांचन खोडके, शिरीन खान, जयश्री मरापे, किरण चांदवडकर, डॉ. अर्चना आत्राम, प्रथमेश गावंडे, अनिकेत क्षीरसागर, चेतन खोपे, कार्तिक कडुस्कर, मयुर तायडे, सतीश गवई, प्रीतम ठाकूर, प्रकाश नगराळे, शेखर सुरमवार, अशफाक खान, रफीक भाई चिकुवाले, राजाभाऊ हाडोळे, अनिकेत ढेंगळे, सुरेश रतावा, राजीव भेले, प्रशांत महल्ले, प्रदीप अरबट, ज्ञानेश्वर झोंबाडे, दिनेश खोडके, विजय वानखडे, नाना बारबुद्धे, गजानन रडके, मोहन पुरोहित, श्रीधर पुरोहित यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीचा फटका शहरांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकांनाही बसला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर करावा लागतो. परंतु एकतर महाग. त्यातही तुटवडा. अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही इंधन दरवाढीचा तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांच्या मते निकट भविष्यात ठिकठिकाणी आंदोलने होणार आहेत. ग्रामीण काँग्रेसमध्येही खदखद : नागरिकांनाही शंका

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर