ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

हा तोच महाराष्ट्र आहे का?:अशोक खरात प्रकरणावरून अंबादास दानवेंनी व्यक्त केल्या भावना, नेमके काय म्हणाले?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार या खरातने केले असल्याचे समोर आले आहे. तसेच रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो व्हिडिओ अशोक खरातसोबत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. या भोंदुगिरीच्या प्रकरणांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत. अंबादास दानवे यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व तसेच समाजधुरिण यांना उद्देशून म्हटले की, महाराष्ट्र हे देशातील एक अत्यंत पुरोगामी, विचारी आणि स्वाभिमानी प्रवृत्ती जपणारे राज्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाने या मातीला विचारांचे खतपाणी घातले. या महान नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही अंधभक्तीला, बुवाबाजीला किंवा ढोंगीपणाला थारा दिला नाही. उलट, त्यांनी सामान्यांमध्ये तार्किक विचार आणि प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी केली. एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष प्रहार पुढे अंबादास दानवे म्हणाले, आज मात्र राज्याची सद्यस्थिती आणि विशेषतः नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात यांसारखी प्रकरणे पाहिल्यावर मनात दाटून येणारा प्रश्न हाच आहे की, हा खरोखर तोच महाराष्ट्र आहे का? जिथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेबांसारखा अंधश्रद्धा मुळापासून उपटून टाकणारा आणि थोतांडावर आसूड ओढणारा क्रांतीकारी नेता जन्माला आला, त्याच नेत्याचे भक्त म्हणवणारे आज सत्ता आणि स्वार्थासाठी खरात सारख्या भोंदू प्रवृत्तींची संगत आवडीने पसंत करत आहेत? ज्या प्रवृत्तींवर शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर प्रहार केले, आज त्याच प्रवृत्तींच्या मांडीला मांडी लावून माननीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बसलेले पाहून मनात या ढोंगीपणाची चीड उत्पन्न होते, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. तुमचे ‘आक्रोश मोर्चे’ कुठे गेले? पुढे अंबादास दानवे म्हणाले, नाशिकमधील या तथाकथित ‘कॅप्टन’ने ज्या प्रकारे जनता, बायकांची फसवणूक केली आणि त्याला ज्या पद्धतीचे राजकीय अभय मिळत गेले, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. भाजपचे सो कॉल्ड मोर्चा फेम नितेश राणे, महेश लांडगे यांसारखे नेते जे दरवेळी हिंदुत्वाचा आव आणून गळे काढत असतात, त्यांना आज माझा एक सवाल आहे— आता तुमचे ‘आक्रोश मोर्चे’ कुठे गेले? अशोक खरातच्या या भोंदूपणामुळे ज्या शेकडो महिलांची फसवणूक झाली, ज्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्या पीडित महिलाही हिंदूच आहेत ना? मग आज तुमचा हिंदुत्वाचा कैवार कुठे हरवला आहे? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीत? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? माझ्या आईने मला नेहमीच एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे. ते मी पाळतो आणि पाळत राहणार. महाराष्ट्र हा कायम देशाला राजकारण आणि समाजकारणात दिशा देणारा अग्रगण्य प्रांत ठरला आहे. राजकारणाची झालेली अभूतपूर्व वाताहत अख्ख्या देशाने पाहिलीच आहे, पण आता समाजकारणातही आपण अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? हे एकदा स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला नक्की विचारून पहा, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर