ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही:कठोर कारवाईची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपरफुटीचे पडसाद उमटणे सुरुच असून, परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानने दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नीट पेपरफुटीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी च्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर आले. लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली होती. विविध संघटना, राजकीय पक्षांनी मोटेगावकरच्या अकोल्यातील कार्यालया बाहेर आंदोलनही केले होते. दरम्यान आता याचअनुषंगाने पॅक्टो व अशोक प्रतिष्ठानने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. नीटमधील प कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा धक्का बसला आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा आर्थिक त्याग आणि मानसिक संघर्ष यावर प्रश्नपत्रिका फुटीसारख्या घटनांमुळे पाणी फिरत आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता व विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही संघटनेचे म्हणणे आहे. निवेदन देताना प्रा. डॉ. विजय आठवले, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, प्रा. शैलेश इंगळे, विद्याधर मोहोड, संदेश गवई, महेंद्र मोहोड, अनिल गवई, प्रा. विवेक पांडे, प्रा. सज्जन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नीट पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्रपणे उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. पेपर फुटिमुळे प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी संगटनेने केली आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढते व्यापारीकरण, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही संघटनांच्या वतीने देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर