ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मालेगावच्या महापौरपदी IP च्या शेख नसरीन बानो:उपमहापौरपदी SP च्या शान – ए – हिंद; मतदानानंतर लिफ्ट कोसळल्याची घडली दुर्घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या (IP) शेख नसरीन बानो खालिद, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान – ए – हिंद यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजप व एमआयएमने तटस्थ भूमिका घेतली. त्याचा लाभ थेट इस्लाम पार्टीला झाला. मालेगाव महापालिकेत आज जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात महापौरपदासाठी एकूण 5 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. पडताळणीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, शेख ताहेरा रशीद व शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचा अर्ज वैध ठरला. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यात इस्लाम पार्टीच्या शेख ताहेरा शेख रशीद यांनी आपला अर्ज मागे घेतला. परिणामी, शेख नसरीन बानो व लता घोडके यांच्यात थेट लढत झाली. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत शेख नसरीन बानो खालिद यांना 43 मते मिळाली. तर शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांना केवळ 18 मतांवर समाधान मानावे लागले. यामुळे नसरीन बानो यांचा 25 मतांच्या फरकाने दणदणीत विजय झाला. भाजप – एमआयएमची तटस्थ भूमिका महापालिका सभागृहात झालेल्या आजच्या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5, काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 18, भाजपचे 2 व एमआयएमचे 21 नगरसेवक उपस्थित होते. भाजप व एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्यामुळे त्याचा थेट लाभ इस्लाम पार्टीच्या उमेदवाराला झाला. सप व काँग्रेसची मतेही या पक्षाला मिळाली. उपमहापौरपदी शान – ए – हिंद दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या शान – ए – हिंद यांचा विजय झाला आहे. त्यांना शिवसेनेच्या अॅड. नीलेश काकडे यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीसाठी एकूण 8 अर्ज दाखल झाले होते. पडताळणीनंतर शान-ए – हिंद यांच्यासह, एमआयएमचे हाफीज अब्दुल्ला मुफ्ती इस्लाईल, शिवसेनेचे नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, नीलेश काकडे, सपचे मोहम्मद मुश्तकीन मोहम्मद मुस्तफा यांचे अर्ज वैध ठरले. पैकी हाफीज अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, मोहम्मद मुश्तकीन मोहम्मद मुस्तफा व नरेंद्र सोनवणे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शान – ए – हिंद यांना 43 मते पडली, तर नीलेश काकडे यांना अवघ्या 18 मतांवर समाधान मानावे लागले. सपच्या उमेदवाराला इस्लाम पार्टी व काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला. हिरव्या अन् भगव्या पोशाखाची चर्चा उल्लेखनीय बाब म्हणजे या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टी, सप व काँग्रेसचे नगरसेवक लक्झरी बसमधून एकत्रितपणे महापालिकेत दाखल झाले होते. महिला सदस्यांनी काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, तर पुरुष सदस्यांनी डोक्यावर हिरवे फेटे व अंगावर इस्लाम पार्टीचा गमच्छा परिधान केला होता. त्याची स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. शिवसेनेचे नगरसेवकही भगवे शर्ट, साड्या व भगवे फेटे घालून सभागृहात आले होते. या निवडणुकीसाठी महापालिका परिसरात जोरदार बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली, IP चे नेते थोडक्यात बचावले दुसरीकडे, महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक संपताच महापालिका इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक कोसळली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, या लिफ्टमध्ये तब्बल 18 जण अडकले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळताना ती थेट तळमजल्यावर न आदळता तिचा दरवाजा पहिल्या मजल्यावर अडकला. यामुळे मोठा अर्थ टळला. सर्वजण सुखरुप राहिले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एकेक करून बाहेर काढले. या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे असिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक व 5 पत्रकारही अडकले होते.
खालील तक्त्यात पाहा मालेगाव मनपातील पक्षीय बलाबल
:
:
:
:
:
:

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर