ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा पॅटर्न राज्यासाठी आदर्श:परदेशी भाषा, एआयच्या उपक्रमांचे नितीन लालसरे यांच्याकडून कौतूक‎

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी फ्रेंच, चायनीज, इटालियन आणि स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषा आत्मविश्वासाने बोलत असतील, स्वतःची विद्यार्थी सहकारी बँक चालवत असतील, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण घेत असतील, तर तो संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी उपक्रम असून, राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे यांनी केले. लालसरे यांनी निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, डोंगरगाव येथे सदिच्छा भेट देत शाळेतील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. शाळेतील खुशी आणि ईश्वरी या विद्यार्थिनींनी परदेशी भाषांमध्ये त्यांचे स्वागत केले, तर विद्यार्थी सहकारी बँकेच्या बाल व्यवस्थापकांनी बँकेच्या कामकाजाची माहिती सादर केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नितीन लालसरे यांनी स्वतःचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडला. दहावीत इंग्रजी विषयात नापास झाल्यानंतरही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत इंग्रजीचे प्राध्यापक झालो. त्याच इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे मुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून मोठी स्वप्ने पाहावीत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी त्यांच्या कन्येच्या नावाने स्थापन केलेल्या ‘राहा लालसरे फाउंडेशन’च्या माध्यमातून शाळेला आवश्यक शैक्षणिक साहित्य व विकासकामांसाठी मदत देण्याची घोषणा केली. तसेच शाळेच्या विविध प्रलंबित मागण्या शासन स्तरावर मांडून त्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे डोंगरगाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूलच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली असून, परिसरातून शाळेच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर