ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

चिमणपुरी पिंपळे येथे विद्युत रोहित्र, वीज तारांची दुरवस्था:डीपीलगत तार तुटल्याने शेतकऱ्यांचा जीव धाेक्यात; पेरणीलाही अडचण‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमळनेर तालुक्यात पिंपळे परिसरात खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, येथील शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्राची (डीपी) प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या “डीपी’लगतची वीजतार तुटून पडलेली असल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या रोहित्राला संरक्षणासाठी लोखंडी पेटी किंवा फेन्सिंगची कोणतीही व्यवस्था नाही. खरीप हंगामामुळे सध्या शेतात ट्रॅक्टर, मजूर आणि शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत उघडे रोहित्र आणि जमिनीवर पडलेली वीज तार यामुळे शेतकरी व जनावरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून, हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करूनही त्यांनी अद्याप याकडे पाठ फिरवली असल्याचा संतप्त आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, महावितरणच्या अशाच निष्काळजीपणामुळे मागील रब्बी हंगामात याच परिसरातील गव्हाच्या पिकाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. या जुन्या घटनेतून ही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. “मागच्या हंगामात पीक जळाले, आता खरीप पेरणी अडली; महावितरणने आणखी किती नुकसान झाल्यावर जागे व्हायचे?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर