ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अकोल्यात कोट्यवधींचा घोटाळा उघड:गजानन पतसंस्थेत गैरव्यवहार; अध्यक्ष आणि सीईओ अटकेत, ठेवीदारांचे 25 कोटी अडकले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार गेल्या काही महिन्यांपासून समोर येत होती. ठेवीदारांनी वारंवार पैसे परत मागूनही संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या 6 महिन्यांपासून ठेवीदारांना परतावा देणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत होता. अखेर अनेक तक्रारी आणि प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात हस्तक्षेप करत मोठी कारवाई केली. चौकशीत संस्थेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. या पतसंस्थेत सुमारे अडीच हजार ठेवीदारांचे पैसे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. नोकरदार, पेन्शनर, कामगार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांनी आयुष्यभराची बचत या संस्थेत ठेवली होती. संस्थेतील एकूण ठेवींची रक्कम 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. ठेवीदारांनी आरोप केला आहे की, संस्थेच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपहार केलेली रक्कम इतरत्र गुंतवली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली. त्यानंतर अध्यक्ष नारायण आवारे आणि त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे सहकारी पतसंस्थांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठेवीदारांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अडकलेली रक्कम परत कधी मिळणार याबाबत चिंता दरम्यान, श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अकोल्यात 2 तर तेल्हारा येथे 1 शाखा कार्यरत असल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यापासून संस्थेकडून ठेवीदारांना पैसे देणे थांबवण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आता या कारवाईनंतर ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अडकलेली रक्कम परत कधी मिळणार याबाबत मोठी चिंता कायम आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर